शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

चीननं प्लॅन करून हल्ला केला, सरकार झोपलं होत का?; तीन मुद्दे उचलंत राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 13:00 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या ट्विटसोबतच एएनआयचे एक वृत्तही ट्विट केले आहे. यात, संरक्षण राज्य मंत्री श्रीपद नाईक यांचे वक्तव्य आहे.

ठळक मुद्देभारत-चीन सीमेवर झालेल्या हिंसक झटापटीत भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी तीन मुद्दे उपस्थित केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या ट्विटसोबतच एएनआयचे एक वृत्तही ट्विट केले आहे.

नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर झालेल्या हिंसक झटापटीत भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले. यामुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. काँग्रेस नेते राहुल गांधीदेखील याच मुद्द्यावरून सातत्याने मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीपूर्वी राहुल गांधींनी पुन्हा एकदा सरकारवर निषाणा साधला. राहुल गांधी म्हणाले, चीनचा हल्ला नियोजित होता. मात्र, आपलं सरकार झोपलेलं होतं.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी तीन मुद्दे उपस्थित केले आहेत. राहुल यांनी लिहिले, "आता हे सिद्ध झाले आहे, की चीनने गलवानमध्ये जो हल्ला केला तो आधीपासूनच नोयोजित होता. भारत सरकार यावेळी झोप घेत होते आणि समस्यांकडे दुर्लक्ष करत होते. या शिवाय राहुल गांधींनी लिहिले आहे, सरकारच्या हलगर्जीपणाचा परिणाम आपल्या जवानांना भोगावा लागला आहे.

India China Face Off: पंतप्रधान मोदींची सर्वपक्षीय बैठक आज; जाणून घ्या, कोण होणार सहभागी, कुणाला निमंत्रण नाही

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या ट्विटसोबतच एएनआयचे एक वृत्तही ट्विट केले आहे. यात, संरक्षण राज्य मंत्री श्रीपद नाईक यांचे वक्तव्य आहे. चीनने केलेला हा हल्ला आधीपासूनच नोयोजित होता, असे श्रीपद नाइक यांनी मान्य केले आहे. तसेच  भारतीय लष्कर चीनला चोख उत्तर देईल असे म्हटले होते.

India China Faceoff : हिंसक झटापटीत चीनचे 35 सैनिक ठार, अमेरिकन गुप्तचर संस्थेचा दावा

नाइक आपल्या वक्तव्यात म्हणाले होते, राष्ट्रीय सुरक्षिततेच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे संरक्षण केले जाईल.

आज सर्वपक्षीय बैठक -याच मुद्द्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यात राजकीय पक्षांचे अध्यक्ष सहभागी होणार आहेत. या बैठकीत, चीनसोत सुरू असलेला वाद आणि सद्य स्थितीवर चर्चा होणार आहे. ही बैठक सायंकाळी पाच वाजता व्हर्च्युअल (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) पद्धतीने होईल. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते या बैठकीत सहभागी  होणार आहेत.

गलवानमधील विश्वासघातकी कृत्यानंतर, आता चीन दाखवतोय 'या' महाविनाशक बॉम्बची भीती; पाहा VIDEO 

15 जूनच्या रात्री हिंसक झटापट -15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्याजवळ भारतीय जवान आणि चीनी सैनिकांत चकमक झाली. यात भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले. तर चीनचेही मोठे नुकसान झाले. यात चीनचे 35 जवान मारेल गेले असल्याचा दावा अमेरिकन गुप्तचर संस्थेने केला आहे. मात्र, यासंदर्भात चीनने अद्याप कुठलेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.

पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले आहेत 'आमने-सामने'

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीladakhलडाखchinaचीनIndiaभारत