चीननं प्लॅन करून हल्ला केला, सरकार झोपलं होत का?; तीन मुद्दे उचलंत राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 12:57 PM2020-06-19T12:57:12+5:302020-06-19T13:00:12+5:30

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या ट्विटसोबतच एएनआयचे एक वृत्तही ट्विट केले आहे. यात, संरक्षण राज्य मंत्री श्रीपद नाईक यांचे वक्तव्य आहे.

congress leader rahul gandhi attacks modi government on galwan valley india china clash | चीननं प्लॅन करून हल्ला केला, सरकार झोपलं होत का?; तीन मुद्दे उचलंत राहुल गांधींचा हल्लाबोल

चीननं प्लॅन करून हल्ला केला, सरकार झोपलं होत का?; तीन मुद्दे उचलंत राहुल गांधींचा हल्लाबोल

Next
ठळक मुद्देभारत-चीन सीमेवर झालेल्या हिंसक झटापटीत भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी तीन मुद्दे उपस्थित केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या ट्विटसोबतच एएनआयचे एक वृत्तही ट्विट केले आहे.

नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर झालेल्या हिंसक झटापटीत भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले. यामुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. काँग्रेस नेते राहुल गांधीदेखील याच मुद्द्यावरून सातत्याने मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीपूर्वी राहुल गांधींनी पुन्हा एकदा सरकारवर निषाणा साधला. राहुल गांधी म्हणाले, चीनचा हल्ला नियोजित होता. मात्र, आपलं सरकार झोपलेलं होतं.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी तीन मुद्दे उपस्थित केले आहेत. राहुल यांनी लिहिले, "आता हे सिद्ध झाले आहे, की चीनने गलवानमध्ये जो हल्ला केला तो आधीपासूनच नोयोजित होता. भारत सरकार यावेळी झोप घेत होते आणि समस्यांकडे दुर्लक्ष करत होते. या शिवाय राहुल गांधींनी लिहिले आहे, सरकारच्या हलगर्जीपणाचा परिणाम आपल्या जवानांना भोगावा लागला आहे.

India China Face Off: पंतप्रधान मोदींची सर्वपक्षीय बैठक आज; जाणून घ्या, कोण होणार सहभागी, कुणाला निमंत्रण नाही

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या ट्विटसोबतच एएनआयचे एक वृत्तही ट्विट केले आहे. यात, संरक्षण राज्य मंत्री श्रीपद नाईक यांचे वक्तव्य आहे. चीनने केलेला हा हल्ला आधीपासूनच नोयोजित होता, असे श्रीपद नाइक यांनी मान्य केले आहे. तसेच  भारतीय लष्कर चीनला चोख उत्तर देईल असे म्हटले होते.

India China Faceoff : हिंसक झटापटीत चीनचे 35 सैनिक ठार, अमेरिकन गुप्तचर संस्थेचा दावा

नाइक आपल्या वक्तव्यात म्हणाले होते, राष्ट्रीय सुरक्षिततेच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे संरक्षण केले जाईल.

आज सर्वपक्षीय बैठक -
याच मुद्द्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यात राजकीय पक्षांचे अध्यक्ष सहभागी होणार आहेत. या बैठकीत, चीनसोत सुरू असलेला वाद आणि सद्य स्थितीवर चर्चा होणार आहे. ही बैठक सायंकाळी पाच वाजता व्हर्च्युअल (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) पद्धतीने होईल. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते या बैठकीत सहभागी  होणार आहेत.

गलवानमधील विश्वासघातकी कृत्यानंतर, आता चीन दाखवतोय 'या' महाविनाशक बॉम्बची भीती; पाहा VIDEO 

15 जूनच्या रात्री हिंसक झटापट -
15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्याजवळ भारतीय जवान आणि चीनी सैनिकांत चकमक झाली. यात भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले. तर चीनचेही मोठे नुकसान झाले. यात चीनचे 35 जवान मारेल गेले असल्याचा दावा अमेरिकन गुप्तचर संस्थेने केला आहे. मात्र, यासंदर्भात चीनने अद्याप कुठलेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.

पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले आहेत 'आमने-सामने'

Web Title: congress leader rahul gandhi attacks modi government on galwan valley india china clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.