शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
4
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
5
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
6
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
7
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
8
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
9
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
10
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
11
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
12
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
13
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
14
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
15
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
17
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
18
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
19
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
20
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेसनं लबाडीच्या राजकारणामुळं स्वतःला संपवलं", मनोज तिवारींचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 16:20 IST

Haryana Assembly Election 2024: जाहीर सभेला संबोधित करताना मनोज तिवारी यांनी शक्ती राणीला मतदान करण्याचे आवाहन केले. 

Haryana Assembly Election 2024: हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले आहे. येत्या ५ ऑक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचाराला वेग आला आहे. दरम्यान, भाजप खासदार मनोज तिवारी हे भाजप उमेदवार शक्ती राणी शर्मा यांच्या समर्थनार्थ प्रचारासाठी हरियाणाच्या कालका विधानसभा मतदारसंघात दाखल झाले आहेत. यावेळी जाहीर सभेला संबोधित करताना मनोज तिवारी यांनी शक्ती राणीला मतदान करण्याचे आवाहन केले. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज तिवारी यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. मनोज तिवारी म्हणाले की, काँग्रेसने लूटमार आणि लबाडीच्या राजकारणामुळे स्वतःला संपवले आहे. काँग्रेसने छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशमध्ये जशी खोटी आश्वासने दिली, तशीच खोटी आश्वासने आता हरियाणामध्येही देत ​​आहेत. काँग्रेस नेहमीच देशाला जातींमध्ये विभागण्याचा प्रयत्न करते. तसेच, काँग्रेसचे नेते राहुल गांधी नेहमीच आपल्या सैन्य दलाचे मनोधैर्य कमी करतात. सैन्याला बळ देणारा प्रत्येक प्रयत्न त्यांना दडपून टाकायचा आहे, असे मनोज तिवारी यांनी सांगितले.

यासोबतच हरियाणात भाजपचे सरकार तिसऱ्यांदा स्थापन करण्याचा दावा मनोज तिवारी यांनी केला. कालका मतदारसंघातून शक्ती राणी शर्माही प्रचंड मतांनी विजयी होतील, असे ते म्हणाले. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील भाजप उमेदवार शक्ती राणी शर्मा यांच्या समर्थनार्थ प्रचारासाठी कालका येथे आले होते.

भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार - रवी किशनभाजप खासदार रवी किशन हे भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ एका जाहीर सभा घेत आहे. कर्नालमध्ये रवी किशन यांनी सभा घेतली. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी तिसऱ्यांदा भाजप सरकार स्थापन करण्याचा दावा केला. नायबसिंग सैनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार असल्याचेही सांगितले. तसेच, भाजपचे सरकार आल्यास महिलांना लाडली बहीण योजनेत २१०० रुपये दरमहा मिळतील, अग्नीवीरांना सरकारी नोकऱ्या मिळतील. ५०० रुपयांना सिलिंडर मिळत आहे. प्रत्येकाच्या खात्यात ३०४ रुपये परत येत आहेत. भाजपचे सरकार आल्यास गरीब मुलींच्या लग्नासाठी पैसे मिळतील. प्रत्येक गरीबाला घर मिळेल आणि राज्यातील सर्व जनतेला सुरक्षा मिळेल, असे रवी किशन यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाHaryanaहरयाणा