शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

नवज्योतसिंग सिद्धू अन् सचिन पायलट यांना जबाबदाऱ्या देण्याबाबत पक्षश्रेष्ठी द्विधा मन:स्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 5:27 PM

नवज्योतसिंग सिद्धू यांनी भाजपचा त्याग करून काही काळाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

- व्यंकटेश केसरी नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत व पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या विरोधामुळे काँग्रेसचे युवा नेते सचिन पायलटनवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर कोणतीही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्याबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठी द्विधा मन:स्थितीत आहेत. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री अशोक गेहलोतविरोधात त्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट व त्यांच्या समर्थक आमदारांनी बंड पुकारले होते. त्यावेळी पायलट यांची भाजपशी जवळीक निर्माण झाली होती. नवज्योतसिंग सिद्धू यांनी भाजपचा त्याग करून काही काळाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

सिद्धू २००९ साली लोकसभेचे सदस्य बनले. मात्र, त्यांना २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांत उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर सिद्धू यांना भाजपने राज्यसभेवर पाठविले होते. सचिन पायलट व नवज्योतसिंग यांचे काँग्रेस नेते राहुल गांधी व सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याशी उत्तम संबंध आहेत. मात्र, तरीही अशोक गेहलोत, अमरिंदरसिंग या दोन काँग्रेस मुख्यमंत्र्यांना काँग्रेस पक्षश्रेष्ठी दुखावू इच्छित नाहीत. या दोन मुख्यमंत्र्यांची गांधी घराणे व काँग्रेसवरील निष्ठा वादातीत आहे, तसेच राजस्थान व पंजाबमध्ये दोन वर्षांनी विधानसभा निवडणुकाही आहेत. 

काय आहे संपूर्ण प्रकरण -

देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस सध्या अनेक संकटांचा सामना करत आहे. जितिन प्रसाद यांनी काँग्रेस सोडली. नवोजत सिंग सिद्धू आणि सचिन पायलट नाराज आहेत. काँग्रेसमध्ये चिंतन आणि मंथम सुरू आहे. सध्या, सचिन पायलट मौन आहेत. मात्र, त्यांच्या मौन असण्यामागचे कारण त्यांची नाराजी आहे आणि नाराजीमागे ती आश्वासनं आहेत जी अद्यापही पूर्ण झालेली नाहीत.

पंजाबमधील वाद 10 दिवसांत मार्गी लागतो. मज राजस्थानमध्ये 10 महिने होऊनही मार्ग का सापडत नाही? असा सवाल पायलट समर्थक आमदार करत आहेत. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस भंवर जितेंद्र सिंह यांनीही म्हटले आहे, की पायलट यांना देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हायला हवी. यासंदर्भात एकीकडे काँग्रेसमध्ये मंथन सुरू आहे. तर दुसरीकडे पायलट यांच्या घरी काल बैठ झाली.

टॅग्स :congressकाँग्रेसSachin Pilotसचिन पायलटNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धू