शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद, या मतदारसंघात भाजपा बिनविरोध जिंकणार?   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 14:36 IST

Lok Sabha Election 2024: गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपाचं खातं उघडण्याची शक्यता आहे. सूरत लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. तर आता येथून रिंगणात असलेले ७ अपक्ष उमेदवारही आपला अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे.

गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपाचं खातं उघडण्याची शक्यता आहे. सूरत लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. तर आता येथून रिंगणात असलेले ७ अपक्ष उमेदवारही आपला अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. मात्र आता सर्वांच्या नजरा ह्या बसपाच्या उमेदवारावर आहेत. आता बसपानेही उमेदवारी अर्ज मागे घेतला तर येथून भाजपाचा बिनविरोध विजय होऊ शकतो.

सूरत लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला आहे. त्यानंतर भाजपा येथून बिनविरोध जिंकणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.  या मतदारसंघातून एकूण १० जणांनी अर्ज दाखल केला होता. मात्र येथून काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज रद्द झाला आहे. त्यामुळे आता भाजपा उमेदवाराविरोधात आता ८ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र हे आठही उमेदवार आपली उमेदवारी मागे घेतील, अशी चर्चा सुरू आहे.

गुजरातमधील लोकसभेच्या २६ जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे.  येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख १९ एप्रिल होती. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख २२ एप्रिल आहे. भाजपाने तक्रार केल्यानंतर काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज अनुमोदकांमुळे फेटाळला गेल्याचे सांगण्यात येत आहे. आता बसपाचे उमेदवार काय भूमिका घेतात यावर इथल्या निवडणुकीचं गणित अवलंबून असेल. तसेच काँग्रेस आता आपली ताकद बसपा उमेदवार किंवा एखाद्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देऊ शकतो.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपाsurat-pcसूरतgujarat lok sabha election 2024गुजरात लोकसभा निवडणूक निकाल २०२४