शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सदस्यांवरील निलंबन मागे घेईपर्यंत काँग्रेसचा कामकाजावर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 06:26 IST

संसदेबाहेर ‘गांधीगिरी’ : उपसभापतींनी चहा-नाश्ता आणला; पण, निलंबित सदस्यांनी नाकारला

विकास झाडे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : रविवारी राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या आठ सदस्यांनी संसदेच्या आवारात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे धरले. ज्यांच्यासमोर हा गोंधळ झाला ते उपसभापती हरिवंश नारायण सिंह हे गांधीगिरी करीत या सदस्यांसाठी चहा-नाश्ता घेऊन आंदोलनस्थळी पोहोचले; पण, आठही सदस्यांनी तो नाकारला. शेतकऱ्यांच्या प्रश्नी देशभरात आंदोलन करणार आणि निलंबन मागे होईपर्यंत कामकाजात सहभागी होणार नसल्याची घोषणा कॉँग्रेसने केली.

रविवारी राज्यसभेत कृषी विधेयक सादर करताना काँग्रेस खासदारांनी गोंधळ घातला होता. या वेळी उपसभापतींसमोर असलेला माइक तोडण्याचा प्रयत्न झाला. विरोधी पक्षाचे राजीव सातव, रिपून बोरा, सईद नासीर हुसेन, डेरेक ओब्रायन, दोला सेन, संजय सिंह, के. के. रागेश, इल्लामारम करीम यांना गोंधळ घातल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले. त्यानंतर मात्र राज्यसभेचे कामकाज चालू शकले नाही. हे आठही सदस्य सरकारचा निषेध करीत संसद परिसरातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसले आहेत. या सर्व सदस्यांनी इथेच रात्र काढली.निलंबन मागे घेतले जात नाही तोवरकाँग्रेस सदस्यांचा कामकाजावर बहिष्कारजोपर्यंत निलंबन मागे घेतले जात नाही तोपर्यंत काँग्रेस सदस्यांचा कामकाजावर बहिष्कार असेल, असे राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते गुलाब नबी आझाद यांनी जाहीर केले. त्यांनी निलंबित आठ सदस्यांची धरणे स्थळावर जाऊन भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भेट दिली.आझाद म्हणाले की, व्यापाऱ्यांनी शेतकºयांचा माल घेताना तो किमान आधारभूत मुल्यापेक्षा कमी भावात घेतला जाणार नाही अशी तरतूद या कायद्यात करण्यात यावी. देशभरात आम्ही स्वाक्षरी मोहिम राबवित आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.कॉँग्रेसचे राजीव सातव यांनी संसद परिसरातील धरणे आंदोलन थंबविण्यात आले असले तरी देशाच्या रस्त्यास्त्यावर नेऊन सरकार कसे शेतकरी विरोधी आहे ते त्यांना पटवून देऊ, हे आंदोनल आता देशव्यापी केले जाई असे त्यांनी सांगितले.रिपून बोरा यांनी उपसभापती यांनी आमच्यासाठी चहा आणून जशी सह्दयता दाखवली तशीच संसदेत चर्चा करून निलंबन मागे घ्यावे अशी प्रतिक्रिया दिली.माफी मागा, निलंबन मागे घेऊ!निलंबित करण्यात आलेल्या सदस्यांनी त्यांच्या कृतीबाबत माफी मागीतली तर त्यांच्या निलंबनाबाबत विचार केला जाऊ शकतो असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी ट्विटही केली.हरसिमरत कौर यांचे राष्ट्रपतींना पत्रएनडीए सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देणाºया हरसिमरत कौर यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना ट्विट करीत लोकसभेत आणि राज्यसभेत संमत करण्यात आलेली ही कृषि विधेयके स्वाक्षरी न करताच परत पाठवण्याची विनंती केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर झालेल्या या विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याला कायद्याचं स्वरुप प्राप्त होईल. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेस