“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 15:16 IST2026-04-28T15:16:55+5:302026-04-28T15:16:55+5:30

Congress Slams Arvind Kejriwal: अडचणीत आलेले असताना अरविंद केजरीवाल यांना महात्मा गांधी यांची तत्त्वे आणि सत्याग्रह आठवला, असा टोला काँग्रेसने लगावला.

congress asked why does not arvind kejriwal put up a portrait of mahatma gandhi in his office | “अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल

“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल

Congress Slams Arvind Kejriwal: आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांना पत्र लिहिले असून, उत्पादन शुल्क प्रकरणात आपण प्रत्यक्ष किंवा वकिलाद्वारे हजर राहणार नाही, असे त्यात नमूद केले आहे; अशी माहिती पक्षाने दिली. यावरून आता काँग्रेसनेअरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. तसेच अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत, अशी विचारणाही केली आहे.

न्यायाची गंभीर गळचेपी होत असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी चार पानी पत्रात म्हटले आहे. कायदा, न्यायालयाचा मान व न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास या बाबी लक्षात घेऊन, मी प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकत आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी किंवा कार्यवाहीमध्ये मी प्रत्यक्ष किंवा माझ्या वकिलाद्वारे सहभागी होणार नाही. न्याय केवळ झालाच पाहिजे असे नाही, तर तो होताना दिसलाही पाहिजे. यावर काँग्रेस नेते उदित राज यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. 

आता केजरीवालांना गांधीजींची तत्त्वे आणि सत्याग्रह आठवला

एक्सवर एक पोस्ट करत उदित राज यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. लोक खरेच खूप भोळे आहेत. अरविंद केजरीवाल यांच्याकडे पाहून असा समज होतो की, त्यांनी भगत सिंग आणि डॉ. आंबेडकर वगळता गांधीजींचे एकही चित्र कधी लावले नाही. आता, जेव्हा ते पकडले गेले आहेत, तेव्हा त्यांना गांधीजींची तत्त्वे आणि सत्याग्रह आठवला आहे. त्यांच्या प्रतिकांमध्येही भ्रष्टचार आणि अप्रामाणिक दिसत आहे, असे उदित राज यांनी एक्सवर म्हटले आहे. 

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणाच्या सुनावणीतून न्यायाधीशांनी स्वतःला दूर ठेवावे, अशी मागणी करणारी अरविंद केजरीवाल यांची याचिका फेटाळून लावली होती. 

Web Title : केजरीवाल गांधी की तस्वीर क्यों नहीं लगाते? कांग्रेस का सवाल।

Web Summary : कांग्रेस ने केजरीवाल पर आबकारी मामले में अदालत से बचने के लिए निशाना साधा। उदित राज ने केजरीवाल के गांधीवादी सिद्धांतों के प्रति नए पालन पर सवाल उठाया, और कहा कि उनके कार्यालय में गांधी की तस्वीर पहले कभी नहीं थी।

Web Title : Why doesn't Kejriwal display Gandhi's image? Congress questions.

Web Summary : Congress criticizes Kejriwal for avoiding court in the excise case. Udit Raj questions Kejriwal's newfound adherence to Gandhian principles, noting the absence of Gandhi's image in his office until now.