शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी अधिवेशनात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार : पत्रकार परिषदेत दिली माहिती

By admin | Updated: July 6, 2015 23:34 IST

सोलापूर :

सोलापूर :
येत्या पावसाळी अधिवेशनात कोणते प्रश्न मांडायचे, कोणत्या विषयावर सरकारला कोंडीत पकडायचे यासह अनेक विषयांवर चर्चा करून पावसाळी अधिवेशनासंदर्भात व्यूहरचना आखण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीचे दोन्ही विरोधी पक्षनेते काम करणार असल्याची माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली़
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी अजित पवार हे सोेलापूर दौर्‍यावर आले होते़ यानिमित्त हॉटेल बालाजी सरोवर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी ते बोलत होते़ यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्षनिरीक्षक प्रदीप गारटकर, आ़ दीपकआबा साळुंखे-पाटील, माजी आमदार राजन पाटील, आ़ बबनदादा शिंदे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मनोहर सपाटे, महेश गादेकर, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष पवार, दिलीप कोल्हे आदी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते़
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्याचे पावसाळी अधिवेशन १३ जुलै रोजी होणार आहे़ या अधिवेशनात शासनाला विविध विषयावर कोंडीत पकडण्याचा काँग्र्रेस व राष्ट्रवादीचा डाव असणार आहे़ भाजप सरकार हे फसवे सरकार आहे़ निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांची आजपर्यंत पूर्तता केली नाही़
दरम्यान, दाऊदविषयीची फाईल शरद पवार मुख्यमंत्री असताना आली होती़ मात्र त्यावेळी शरद पवार यांनी हा प्रस्ताव नाकारला होता़ एमआयएम पक्ष हा चुकीचा प्रचार करून युवकांना प्रभावित करीत असल्याची टीकाही अजित पवार यांनी केली़
यावेळी माजी महापौर कय्युम बुर्‍हाण, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल, बाळराजे पाटील आदी राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़
इन्फो बॉक्स़़़़़़़़़़
मुुंडे, तावडेंनी राजीनामा द्यावा
महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळा तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची बोगस पदवी व अग्निशमन यंत्रात प्रचंड मोठा भ्रष्टाचार केल्याची माहिती समोर येत आहे़ जोपर्यंत आरोप सिध्द होत नाहीत तोपर्यंत पंकजा मुंडे व विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे़
इन्फो बॉक्स़़़़़़़़़़़
रमेश कदम चुकीचेच़़़
प्रशासनाविरोधात दबाव आणण्यासाठी हजारोंच्या संख्येने काढलेला मोर्चा हा चुकीचाच आहे़ शिवाय अटक करणार नाही असे पोलिसांचे पत्र असतानाही अटक करण्यासाठी आ़ रमेश कदम यांनी पोलीस ठाण्यावर धाव घेणे अयोग्य आहे़ आ़ रमेश कदम यांनी प्रशासनाच्या विरोधात घेतलेली भूमिका ही चुकीचीच आहे़ त्यांना तुर्तास पक्षातर्फे समज देणार आहे़ त्यानंतरही सुधारणा न झाल्यास पक्षातर्फे कारवाई करण्यात येईल, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला़
इन्फो बॉक्स़़़़़़़़़़
नेत्यांची बेशिस्त खपवून घेणार नाही
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सर्वसामान्य जनतेच्या कामांना प्राधान्य द्यावे़ राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने कायदा मोडू नये़ प्रशासनाच्या मदतीने विकासकामे करावीत़ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अथवा कार्यकर्त्यांनी बेशिस्त वर्तन केल्यास त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले़