शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत पकडलेल्या दहशतवाद्याची पाकिस्तानी असल्याची कबुली

By admin | Updated: September 25, 2016 11:32 IST

जम्मू काश्मीरमध्ये बीएसएफच्या जवानांनी घुसखोरी करताना जीवंत पकडलेला दहशतवादी अब्दुल कयूम याने लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदकडून प्रशिक्षण मिळाले असल्याची कबुली

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 25-  जम्मू काश्मीरमध्ये  बीएसएफच्या जवानांनी घुसखोरी करताना जीवंत पकडलेला दहशतवादी अब्दुल कयूम याने  लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदकडून प्रशिक्षण मिळाले असल्याची कबुली दिली आहे. पाकिस्तानी असल्याचं देखील त्याने मान्य केलं आहे. भारताच्या सीमा सुरक्षा दलाने शुक्रवारी अखनूर येथून अब्दुल कयूममला अटक केली होती. यामुळे पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा पुन्हा एकदा फाटला असून भारताच्या हाती जिवंत पुरावा लागल्याने पाकिस्तानने केलेले सर्व दावे खोटे ठरणार आहेत. 

कयूम हा पाकिस्तानमधील सियालकोटचा रहिवासी आहे. १२ वी पर्यंत शिकलेला कयूम हा १६ व्या वर्षांपासून कट्टरतावादाकडे झुकला. त्याच्याकडून एक मोबाईल आणि दोन सिम कार्डही जप्त करण्यात आले. बीएसएफने कयूमची कसून चौकशी करत आहेत.पाकिस्तानमधील मानसेरा कॅम्पमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण घेत असल्याची कबुली या दहशतवाद्याने दिली आहे. दरम्यान, जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधीत दोघा जणांना सैन्याने शनिवारी अटक केली आहे.  एहसान कुर्शीद आणि फैजल हुसैन अशी या दोघांची नावे आहेत.