शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

मनपाची लिफ्ट चालवितात नागरिक आयुक्तांकडे तक्रार: गंभीर घटनेची भीती

By admin | Updated: December 27, 2015 00:20 IST

जळगाव : महापालिकेतील लिफ्ट चक्क नागरिक चालवत असल्याची तक्रार कॉ. शहीद भगतसिंग मनपा कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली असून हा प्रकार एखाद्या वेळी जीवघेणा ठरू शकतो अशी भीती व्यक्त केली आहे. सुरू असलेल्या लिफ्टवर तातडीने कर्मचारी नेमावेत असेही सुचविण्यात आले आहे.

जळगाव : महापालिकेतील लिफ्ट चक्क नागरिक चालवत असल्याची तक्रार कॉ. शहीद भगतसिंग मनपा कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली असून हा प्रकार एखाद्या वेळी जीवघेणा ठरू शकतो अशी भीती व्यक्त केली आहे. सुरू असलेल्या लिफ्टवर तातडीने कर्मचारी नेमावेत असेही सुचविण्यात आले आहे.
मनपा कर्मचारी संघटनेच्या या निवेदनात म्हटले आहे की, मनपाच्या विविध विभागातील कर्मचारी संख्येचे अवलोकन केले असता काही विभागात आवश्यकतेपेक्षा जास्त शिपाई असल्याचे आढळून आले आहे. दुसरीकडे लिफ्टवर असलेल्या कर्मचार्‍यांची संख्या तोकडी आहे. बर्‍याच वेळेस लिफ्टवर कर्मचारी नसल्यास घाईत थोड्या माहितीच्या आधारावर नागरिक लिफ्ट पाहीजे त्या मजल्यावर घेऊन जातात व ती तेथेच थांबून असते. अपूर्ण माहितीच्या आधाराव लिफ्ट वर खाली नेणे एखाद्या वेळी धोकादायकही ठरू शकते.
असे आहेत कर्मचारी
मनपातील विविध २५ विभागात कार्यरत असलेले शिपाई पुढील प्रमाणे आहेत. महापौर कार्यालय ३, उपमहापौर कार्यालय ३, सभापती दालन ४, विरोधी पक्षनेता दालन २, नरग रचना विभाग ७, भांडार विभाग ३, विधी शाखा ३, नगर सचिव २, विधी शाखा ३, नगरसचिव कार्यालय २, वाहन विभाग ३, अस्थापना विभाग ७, बांधकाम विभाग ५, प्रकल्प शाखा २, आरोग्य विभाग ७, पाणी पुरवठा ३, मार्केट वसुली ७, किरकोळ वसुली ४, खुला भुखंड ४, एलबीटी विभाग ११, लेखा विभाग ५, जन्म-मृत्यू विभाग ६, विद्युत विभाग ३, ग्रंथालय सानेगुरुजी ४ या प्रमाणे शिपाई संख्या आहेत. काही विंभागात अपेक्षेपेक्षा कमी शिपाई संख्या दिसून येते. त्यामुळे हे कर्मचारी लिफ्टवर देता येऊ शकतात. या गंभीर विषयाबाबत त्वरित कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा संघटनेचे अनिल नाटेकर यांनी निवेदनाव्दारे व्यक्त केली आहे.