पालक सचिवाच्या दौर्‍यात अस्वच्छता आयुक्त संतप्त: तीन अधिकार्‍यांवर गंडांतर

By Admin | Updated: July 8, 2015 23:45 IST2015-07-08T23:45:09+5:302015-07-08T23:45:09+5:30

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालक सचिव व मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर सोलापूर दौर्‍यावर येणार असल्याने स्वच्छता ठेवण्याचे आदेश देऊनही हयगय करणार्‍या तीन अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची सूचना आयुक्त विजयकुमार काळम—पाटील यांनी केली आहे.

The Commissioner of the Dispute in the Guardian Secretariat is angry: the three circular genders | पालक सचिवाच्या दौर्‍यात अस्वच्छता आयुक्त संतप्त: तीन अधिकार्‍यांवर गंडांतर

पालक सचिवाच्या दौर्‍यात अस्वच्छता आयुक्त संतप्त: तीन अधिकार्‍यांवर गंडांतर

लापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालक सचिव व मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर सोलापूर दौर्‍यावर येणार असल्याने स्वच्छता ठेवण्याचे आदेश देऊनही हयगय करणार्‍या तीन अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची सूचना आयुक्त विजयकुमार काळम—पाटील यांनी केली आहे.
जिल्‘ाचे पालक सचिव मिलिंद म्हैसकर व नगर विकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर हे मंगळवारी सोलापूर दौर्‍यावर आले होते. त्यांचा दौर्‍याच्या ठिकाणी साफसफाई करण्यात यावी, असे विभागीय अधिकार्‍यांना आयुक्त काळम—पाटील यांनी आदेश दिले होते. पण प्रत्यक्षात त्यांच्या दौर्‍याच्या ठिकाणी साफसफाई झालीच नाही. दौर्‍याच्या वेळेस आयुक्त काळम—पाटील यांना ही बाब खटकली. सोलापूरचे नाव स्मार्ट सिटी योजनेत येण्यासाठी आयुक्त काळम—पाटील गेले तीन दिवस विविध विषयांच्या फायली तयार करण्यात गुंतले होते. यात त्यांना विश्रांतीला वेळ मिळाला नाही. सोमवारी मुंबईतील बैठक आटोपून घाईने ते सोलापुरात दाखल झाले. त्यानंतर पालक सचिवांच्या स्वागताला हजेरी लावली, पण विभागातील अधिकारी मात्र दौर्‍याबाबत गाफील होते.
दौरा आटोपल्यानंतर आयुक्तांनी विभागातील संबंधित उप अभियंत्यावर कारवाई करण्याचे आदेश सहायक आयुक्त अमिता दगडे—पाटील यांना आदेश दिले. त्याप्रमाणे मंगळवारी चौकशी करून सफाई करण्यात हयगय केलेल्या जबाबदार तीन अधिकार्‍यांची नावे निष्पन्न करून कारवाईची फाईल तयार ठेवण्यात आली आहे. पण या फाईलवर आयुक्तांनी सही न केल्याने ते तीन अधिकारी कोण याची बुधवारी महापालिकेत चर्चा रंगली होती. अधिकारी व कर्मचार्‍यांचा कामचुकारपणा वाढला आहे. या मुद्यावर विरोधी सदस्य संतप्त झाले आहेत. प्रभागात नागरिकांचे सोडाच, नगरसेवकांचे म्हणणे अधिकारी विचारात घेत नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे कामचुकारांना घरी बसविण्याची तंबी आयुक्तांनी दिली आहे.
इन्फो...
कचर्‍याचे दर्शन
सोलापुरात कचर्‍याची समस्या गंभीर बनली आहे. भाजपाचे शहर अध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कचरा व पाण्याच्या समस्यांची पंधरा दिवसात सोडवणूक व्हावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. अशात अधिकार्‍यांनी आयुक्तांचा आदेश धुडकावून पालक सचिवांना अस्वच्छतेचे दर्शन घडविले आहे.

Web Title: The Commissioner of the Dispute in the Guardian Secretariat is angry: the three circular genders