20 कोटी किमीवरचा अनोखा धूमकेतू 10 कोटी किमीवर दिसणार; सर्वांना असा घेता येईल पाहण्याचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 05:29 PM2020-07-12T17:29:28+5:302020-07-12T17:39:41+5:30

14 जुलैपासून NEOWISE धूमकेतू वायव्य आकाशात स्पष्टपणे दिसेल. पुढील 20 दिवसांपर्यंत सूर्यास्‍तानंत 20 मिनिटांपर्यंत तो रोज दिसेल.

comet c2020 f3 neowise will be seen in india from 14 july for 20 days | 20 कोटी किमीवरचा अनोखा धूमकेतू 10 कोटी किमीवर दिसणार; सर्वांना असा घेता येईल पाहण्याचा आनंद

20 कोटी किमीवरचा अनोखा धूमकेतू 10 कोटी किमीवर दिसणार; सर्वांना असा घेता येईल पाहण्याचा आनंद

Next
ठळक मुद्दे14 जुलैपासून भारताच्या आकाशात सी/2020 एफ-3 नावाचा एक अनोखा धूमकेतू तब्बल 20 दिनवस पाहता येऊ शकतो.या अनोख्या धूमकेतूला NEOWISE, असे नाव देण्यात आले आहे.हा धूमकेतू सध्या पृथ्वीपासून जवळपास 20 कोटी किलोमीटर दूर अंतराळात आहे.

नवी दिल्‍ली - अंतराळाच्या दुनियेत ज्याना रस आहे, त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. 14 जुलैपासून भारताच्या आकाशात सी/2020 एफ-3 नावाचा एक अनोखा धूमकेतू तब्बल 20 दिवस पाहता येऊ शकतो. हा धूमकेतू 14 जुलैपासून रोज 20 मिनिटांपर्यंत लोक पाहू शकतील. या अनोख्या धूमकेतूला NEOWISE, असे नावही देण्यात आले आहे.

ओडिशाच्या प्लॅनेटरीअमचे उपसंचालक डॉ. सुभेंदू पटनायक यांनी सांगितले, नासाच्या निअर अर्थ वाइड-फिल्ड इन्फ्रारेड सर्वे एक्सप्लोरर (NEOWISE) टेलीस्कोपच्या सहाय्याने मार्चमध्येच हा धूमकेतू शोधण्यात आला होता. असा शक्यता आहे, की हा धूमकेतू 22-23 जुलैला पृथ्वीच्या अगदी जवळ असेल. एवढेच नाही, तर तो पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला वायव्येकडील आकाशात दिसेल.

पटनायक यांच्या मते, 14 जुलैपासून NEOWISE धूमकेतू वायव्य आकाशात स्पष्टपणे दिसेल. पुढील 20 दिवसांपर्यंत सूर्यास्‍तानंत 20 मिनिटांपर्यंत तो रोज दिसेल. लोक याला उघड्या डोळ्यानेही पाहू शकतील. त्यांच्या मते, 14 जुलैला हा धूमकेतू वायव्येकडील आकाशात खालच्या बाजूला दिसेल. तो रोज सायंकाळी आकाशात वरच्या दिशेला जाईल. यानंतर तो सर्वांना दीर्घकाळ दिसू शकेल.

पटनायक म्हणाले, ऑगस्टपासून हा धूमकेतू दिसणे हळू-हळू बंद होईल. टेलीस्‍कोप आणि दुर्बीणीच्या सहाय्याने तो जुलै महिन्यात स्पष्टपणे दिसू शकतो. NEOWISE सध्या पृथ्वीपासून जवळपास 20 कोटी किलोमीटर दूर अंतराळात आहे. 22 जुलैला तो आपल्या ग्रहाच्या सर्वात जवळ येईल. तेव्हा याचे अंतर 10.3 कोटी किलो मीटर एवढे असेल.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus : खूशखबर! कोरोना व्हॅक्‍सीनवर रशियानं मारली 'बाजी'; सेचेनोव्ह विद्यापीठाचा दावा, सर्व प्रकारचे परीक्षण यशस्वी

CoronaVirus : आता उत्तर प्रदेशात लॉकडाउनचा नवा फॉर्म्युला, असा आहे योगी सरकारचा 'प्लॅन'

CoronaVirus : मोलकरणीच्या नावानं पाठवलं पत्नीचं Corona सॅम्पल, रिपोर्ट आला पॉजिटिव्ह!; मग...

धक्कादायक! : हनीट्रॅप अन् 9 कोटी 'हेर'; धूर्त चीन अशी करतो जगाची 'हेरगिरी'

CoronaVirus News: कोरोना व्हायरसवरील सर्वात प्रभावी, सुरक्षित अन् स्वस्त औषध 'Dexamethasone'; संशोधकांचा दावा

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर

Web Title: comet c2020 f3 neowise will be seen in india from 14 july for 20 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.