शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
3
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
4
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
5
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
6
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
7
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
8
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
9
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
10
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
11
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
12
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
13
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
14
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
15
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
16
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
17
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
18
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
19
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
20
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
Daily Top 2Weekly Top 5

आ. जाधव यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन

By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST

हर्षवर्धन जाधव यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन

हर्षवर्धन जाधव यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन

पोलीस अधिकाऱ्यास मारहाण प्रकरण

न्यायालय : २९ पर्यंत सरकारला मागितले उत्तर


नागपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सुरक्षा बंदोबस्त सांभाळणारे पोलीस निरीक्षक पराग जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी गुरुवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने आ. हर्षवर्धन जाधव यांना २९ डिसेंबरपर्यंत तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला.
मारहाणीची ही घटना बुधवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास हॉटेल प्राईडमध्ये घडली होती.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे मंत्री आणि आमदारांची बैठक घेतल्यानंतर ते आपल्या कक्षात गेले होते. त्यानंतर त्यांना भेटण्यासाठी नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. ठाकरे यांच्या भेटीसाठी कुणाला आत सोडायचे, कुणाला नाही, याची जबाबदारी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर होती. कदम यांनी दार उघडून मंत्र्यांना आत घेतले होते. मात्र, जाधव यांना बाहेर थांबण्यास सांगून त्यांनी दार लावून घेतले होते. परिणामी आ. जाधव चिडले होते.
ठाकरे यांचा सुरक्षा बंदोबस्त सांभाळणारे विशेष सुरक्षा पथकातील पोलीस निरीक्षक पराग जाधव यांनी आ. जाधव यांना शांत करण्याचा प्रयत्न करताच जाधव यांनी त्यांच्या कानशिलावर जोरदार थप्पड मारली.
पराग जाधव यांच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी कालच आ. जाधव यांच्याविरुद्ध भादंविच्या ३२३, ३५३, ३३२ कलमान्वये गुन्हा दाखल केला.
अटक टाळण्यासाठी आ. जाधव यांनी आज न्यायालयात धाव घेऊन आपले वकील ॲड. आर. एस. अकबानी आणि ॲड. अतुल मोदी यांच्या मार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. या अर्जातच त्यांनी तात्पुरत्या अटकपूर्व जामिनाची विनंती केली. ती न्यायालयाने मंजूर केली.
न्यायालयाने हर्षवर्धन जाधव यांच्या अर्जावर सरकारला नोटीस जारी करून २९ डिसेंबरपर्यंत उत्तर मागितले आहे. याच दिवशी अटकपूर्व जामीन कायम होण्यावर सुनावणी होणार आहे.