शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण मुंबईत फुटला प्रचाराचा नारळ

By admin | Updated: September 22, 2014 09:49 IST

आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी, तर महायुतीमधील शिवसेना-भाजपासारखे बलाढय़ पक्ष जागावाटपाचा तिढा सोडवण्यात गुंग असले

मुंबई : आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी, तर महायुतीमधील शिवसेना-भाजपासारखे बलाढय़ पक्ष जागावाटपाचा तिढा सोडवण्यात गुंग असले, तरी प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी संभाव्य उमेदवारांना निवडणुकीचा प्रचार सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. त्याप्रमाणे गेल्या आठवडाभरापासून दक्षिण मुंबईतील प्रमुख पक्षांच्या संभाव्य उमेदवारांनी सार्वजनिक मंडळांसोबत गृहनिर्माण सोसायटीच्या मंडळांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.याउलट बलाढय़ पक्षांच्या उमेदवारांमार्फत थेट प्रचार होत नसल्याचा फायदा घेत अपक्ष उमेदवार दारोदारी जाऊन स्वत:चा प्रचार करीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. भायखळ्यातील अपक्ष उमेदवार रोहिदास लोखंडे यांनी सुंदर गल्लीतील इमारतींना भेटी देत प्रचाराचा नारळ फोडला आहे. तर उमेदवारीची खात्री असलेल्या मुंबादेवीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संभाव्य उमेदवार इम्तियाज अनिस यांनी गेल्या आठवडाभरापासून प्रचार सुरू केला आहे.याउलट उमेदवारी जाहीर झाली नसली, तरी वरिष्ठांकडून संदेश मिळालेल्या काही उमेदवारांनी कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांचे मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. वरळीतील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार सुनील शिंदे यांनी नुकत्याच घेतलेल्या मेळाव्याची छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साईट्सवर अपलोड केली आहेत. तर मनसेचे भायखळ्यातील संभाव्य उमेदवार संजय नाईक यांनी सोमवारच्या मेळाव्यात सर्व कार्यकर्त्यांना आमंत्रित केले आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर होण्याआधीच संभाव्य उमेदवारांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केल्याचे चित्र दक्षिण मुंबईत दिसत आहे.महत्त्वाची बाब म्हणजे, प्रचाराची छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचवत असल्याचे निदर्शनास आले. त्याची जबाबदारी उमेदवारांनी कार्यकर्त्यांवर सोपवली आहे. प्रत्येक गाठीभेटीची छायाचित्रे कार्यकर्ते सोशल नेटवर्किंग साईट्सवर अपलोड करीत आहेत. (प्रतिनिधी)