कोळसा घोटाळा : अध्यादेशविरुद्धच्या याचिका खारीज

By Admin | Updated: December 19, 2014 00:29 IST2014-12-19T00:29:09+5:302014-12-19T00:29:09+5:30

नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात कोळसा खाणींच्या लिलावाचा मार्ग प्रशस्त करणार्‍या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका सवार्ेच्च न्यायालयाने गुरुवारी खारीज केल्या. कोलकाता इलेक्ट्रिक सप्लाय कापार्ेरेशन लि.सह अन्य दोन कंपन्यांनी या याचिका दाखल केल्या होत्या.

Coal scam: Disclaimer against the Ordinance | कोळसा घोटाळा : अध्यादेशविरुद्धच्या याचिका खारीज

कोळसा घोटाळा : अध्यादेशविरुद्धच्या याचिका खारीज

ी दिल्ली : संपूर्ण देशभरात कोळसा खाणींच्या लिलावाचा मार्ग प्रशस्त करणार्‍या केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका सवार्ेच्च न्यायालयाने गुरुवारी खारीज केल्या. कोलकाता इलेक्ट्रिक सप्लाय कापार्ेरेशन लि.सह अन्य दोन कंपन्यांनी या याचिका दाखल केल्या होत्या.
न्या. मदन बी. लोकूर, न्या. कुरियन जोसेफ आणि न्या. ए. के. सिकरी यांच्या पीठाने जिंदल स्टील लि. आणि पॉवर लि.सह अन्य तीन खासगी कंपन्यांनी दाखल केलेल्या याचिकाही खारीज केल्या. अवैध खननासाठी आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम भरण्याची ३१ डिसेंबरपर्यंतची सीमा वाढवून देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. डिसेंबर अखेरपर्यंत दंडाची रक्कम न भरताही लिलावात भाग घेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Coal scam: Disclaimer against the Ordinance