शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

गुरू-शिष्य परंपरेतूनच शास्त्रीय गायक घडतात (भाग १)

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

- युवा गायक राहुल देशपांडे : शास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवा

- युवा गायक राहुल देशपांडे : शास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवा
नागपूर : विविध शास्त्रीय संगीताच्या घराण्यांच्या तालमीत पूर्वी गायक तयार व्हायचे. कारण त्यावेळी गुरू त्यांच्यातील शक्तिस्थाने ओळखून त्यांना घडवायचा. गायकांना, कलावंतांना सातत्याने गुरूचे मार्गदर्शन मिळायचे आणि सांगितीक वातावरणातच त्यांचा दिवस जायचा. त्यामुळे आपोआप संगीताचा, स्वरांचा संस्कार कलावंतांच्या मनावर व्हायचा. हल्लीच्या धावपळीच्या जीवनात शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी लागणारा संयम संपतो आहे. आत्म्यापर्यंत पोहोचणारे संगीत शिकण्यासाठी गुरू-शिष्य परंपरेचीच आवश्यकता असल्याचे मत सुप्रसिद्ध गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू युवा गायक राहुल देशपांडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
सप्तकच्या पं. सी.आर. व्यास संगीत महोत्सवात सादरीकरण करण्यासाठी आले असता त्यांच्याशी संवाद साधला. पूर्वी संगीत शिकताना गुरूकडे केवळ संगीताचीच साधना व्हायची. त्यावेळी मोठ्या गायकांची शैली आणि घराण्यांचे गायन ऐकण्याची सोय नव्हती. महत्प्रयासानेच या बाबी शक्य व्हायच्या. हल्ली टच स्क्रीनच्या काळात जगातल्या कुठल्याही गायकाचे गीत नव्या पिढीसमोर उपलब्ध आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने संगीताची साधना करणाऱ्या गायकासाठी अनेक दिग्गज गायकांच्या शैली ऐकण्याची सोय उपलब्ध आहे. पण संगीत शिकण्यासाठी लागणारा संयमच आपण हरवून बसतो की काय? अशी स्थिती सध्या आहे. सध्या शास्त्रीय संगीत म्हणजे काही विशिष्ट रसिकांसाठीच असल्यासारखे सादर होते आहे. कारण शास्त्रीय संगीताकडे लोक कमी प्रमाणात वळत आहेत. हे साधनेचे क्षेत्र आहे. आपले अभिजात भारतीय संगीतच खऱ्या अर्थाने शांतता, समाधान आणि आनंद देणारे आहे. त्यामुळे लोक कुठेही वळले तरी पुन्हा शास्त्रीय संगीताशिवाय पर्यायच नाही, असे राहुल यांनी सांगितले.
माध्यमांच्या प्रसिद्धीमुळे शास्त्रीय गायन आणि कलावंतांना प्रसिद्धी मिळते, पण त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीही अनुभव आहे. काही प्रमाणात राजाश्रय मिळत असल्यामुळे शास्त्रीय संगीताचा प्रसार होत असला तरी संगीताला लोकाश्रयाची जास्त गरज आहे. घराण्यांच्या गायकीचे शिक्षण घेणारे लोक कमी होत असल्याने संगीताच्या खोल तळाशी जाणारे लोकही कमी झाले आहे. भारतीय संगीताचा परिचय सुप्रसिद्ध सितारवादक पं. रविशंकर यांनी जगाला करून दिला. त्यांच्यामुळे भारतीय संगीताला जागतिक स्तरावर एक ओळख मिळाली. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून उस्ताद जाकीर हुसेन, शोभा गुर्टू, त्रिलोक गुर्टू विदेशात चांगले योगदान देत आहेत.
-----