मुफ्तींचा सरकार स्थापनेचा दावा

By Admin | Updated: March 27, 2016 03:15 IST2016-03-27T03:15:32+5:302016-03-27T03:15:32+5:30

पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी शनिवारी राज्यपाल एन.एन. व्होरा यांची भेट घेऊन जम्मू-काश्मिरात सरकार स्थापनेचा दावा सादर केला. मेहबुबा मुफ्ती यांच्या

Claim of the formation of the Mufti Government | मुफ्तींचा सरकार स्थापनेचा दावा

मुफ्तींचा सरकार स्थापनेचा दावा

जम्मू : पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी शनिवारी राज्यपाल एन.एन. व्होरा यांची भेट घेऊन जम्मू-काश्मिरात सरकार स्थापनेचा दावा सादर केला. मेहबुबा मुफ्ती यांच्या रूपाने राज्याला पहिल्या महिला मुख्यमंत्री लाभणार आहेत. मेहबुबा यांनी राज्यपालांची भेट घेतल्यावर सरकार स्थापनेस पाठिंबा दिल्याबद्दल भाजपाचे आभार मानले. नव्या सरकारचा संपूर्ण भर जम्मू-काश्मिरात शांतता, सौहार्द आणि विकासावर असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शपथविधीची तारीख लवकरच ठरेल, असेही मेहबुबा म्हणाल्या. दरम्यान, भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते निर्मलसिंग यांनीसुद्धा राज्यपालांची भेट घेतली आणि पुढील सरकार स्थापनेसाठी मेहबुबा मुफ्ती यांना भाजपाच्या पाठिंब्याचे पत्र त्यांच्या सुपुर्द केले.

Web Title: Claim of the formation of the Mufti Government