नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी विधेयकाची प्रत फाडली. यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला. त्यामुळे लोकसभेच्या हंगामी अध्यक्षा रमा देवी यांनी ओवेसींना सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश दिले. आम्ही जिन्नांची विचारसरणी नाकारुन मौलाना आझादांच्या तत्त्वांचा पुरस्कार करुन वाटचाल केली. आपले आणि हिंदुस्तानचे 1000 वर्षांपासूनचे संबंध असल्याचे आझाद म्हणाले होते. मग आताच्या सरकारला मुस्लिमांची इतकी अडचण का होते, असा सवाल ओवेसींनी उपस्थित केला. नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून देशाच्या विभाजनाचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारनं आणलेलं विधेयक घटनेच्या गाभ्याविरोधात आहे. हे विधेयक आमच्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणारं आहे. देशाची फाळणी करणारं हे विधेयक मी फाडून टाकतो, असं ओवेसी म्हणाले. आपण या विधेयकाला विरोध करत असल्याचं त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं.
Citizenship Amendment Bill: हा कायदा देशाची फाळणी करणारा; ओवेसींनी लोकसभेत फाडली विधेयकाची प्रत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 22:54 IST
असदुद्दीन ओवेसींनी विधेयकाची प्रत फाडताच सभागृहात मोठा गदारोळ
Citizenship Amendment Bill: हा कायदा देशाची फाळणी करणारा; ओवेसींनी लोकसभेत फाडली विधेयकाची प्रत
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}