चुमार भागात चीनची पुन्हा घुसखोरी

By Admin | Updated: September 18, 2014 01:31 IST2014-09-18T01:31:45+5:302014-09-18T01:31:45+5:30

भारत-चीन यांच्यात घुसखोरीबाबत फ्लॅग मिटिंग सुरू असतानाच चीनच्या 1क्क् सैनिकांनी पुन्हा लडाखच्या चुमार भागात घुसखोरी केल्याचे वृत्त आहे.

China reintegrates in Chumar region | चुमार भागात चीनची पुन्हा घुसखोरी

चुमार भागात चीनची पुन्हा घुसखोरी

नवी दिल्ली : भारत-चीन यांच्यात घुसखोरीबाबत फ्लॅग मिटिंग सुरू असतानाच चीनच्या 1क्क् सैनिकांनी पुन्हा लडाखच्या 
चुमार भागात घुसखोरी केल्याचे वृत्त आहे. 
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक मंगळवारी चुमार भागात घुसले होते. काही वेळानंतर ते माघारी परत जातील, अशी अपेक्षा होती. परंतु ते माघारी गेले नाही. बुधवारी पुन्हा 1क्क् सैनिकांनी चुमार भागात प्रवेश केला. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे भारत भेटीवर आगमन झाल्यानंतर काही तासातच चिनी सैन्याने ही घुसखोरी केली, हे विशेष. (वृत्तसंस्था)

 

Web Title: China reintegrates in Chumar region