शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

गोव्यातील सार्वजनिक ठिकाणांवरील मद्यपानावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर घालणार बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 8:34 AM

गोव्यातील सार्वजनिक ठिकाणांवर मद्यपान करण्यास बंदी घातली जाणार आहे.

ठळक मुद्दे गोव्यातील सार्वजनिक ठिकाणांवर मद्यपान करण्यास बंदी घातली जाणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी याबद्दलची माहिती दिली आहे.पुढील महिन्यात या संदर्भातील अधिसूचना काढली जाणार असल्याचंही गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट केलं आहे. मद्यपान करुन अनेकदा लोक गोंधळ घालत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.

पणजी, दि. 18- गोव्यातील सार्वजनिक ठिकाणांवर मद्यपान करण्यास बंदी घातली जाणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी याबद्दलची माहिती दिली आहे. पुढील महिन्यात या संदर्भातील अधिसूचना काढली जाणार असल्याचंही गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट केलं आहे. मद्यपान करुन अनेकदा लोक गोंधळ घालत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळेच सार्वजनिक ठिकाणांवरील मद्यपानावर गोव्यात बंदी घालण्यात येणार आहे. यासाठी सध्याच्या नियमांमध्ये आवश्यक बदल करण्यात येतील, असं मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हंटलं आहे.

गोव्यात जर कोणाला मद्यपान करायचं असेल तर त्याने सार्वजनिक ठिकाणी करू नये. पुढील 15 दिवसांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यपानावर बंदी घालण्याच्या मुद्द्यावर सरकारी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार असल्याचंही पर्रीकरांनी सांगितलं आहे. गोव्यातील मद्य दुकानदार जे ग्राहकांना दुकानाच्या बाजूला थांबून मद्यपान करण्याची परवानगी देता, अशा दुकानदारांना दंड आकारला जाईल किंवा त्यांचा परवाना रद्द केला जाईल, असं पर्रीकर म्हणाले आहेत. 

‘सार्वजनिक ठिकाणांवरील मद्यपानावर बंदी आणण्यासाठी अधिसूचना काढण्याची आवश्यकता आहे. ही अधिसूचना ऑक्टोबरमध्ये काढण्यात येईल. त्यासाठी आम्हाला सध्याच्या नियमांमध्ये बदल करावा लागेल,’ असं पर्रीकर यांनी पणजीतील एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे. सध्या गोवा सरकारकडून राज्यातील मद्यविक्री करणाऱ्या दुकानांना गोवा, दमण आणि दिव अबकारी कायदा, १९६४ च्या अंतर्गत परवाने दिले जातात. याआधी गोवा सरकारने काही ठराविक सार्वजनिक ठिकाणांवर मद्यपान करण्यास बंदी घातली आहे. यामध्ये समुद्र किनाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय गोव्यातील टू-व्हिलर चालकांना हेल्मेट घालण्याची सवय व्हावी, यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचंही पर्रीकरांनी सांगितलं. 

सूर्यास्तानंतर तसंच दारू प्यायल्यानंतर समुद्रात पोहण्यास गोव्यामध्ये बंदी घालण्याचा प्रस्तावमद्य प्यायलेल्या अवस्थेत तसेच सूर्यास्तानंतर समुद्रात पोहण्यास बंदी घालण्याचा विचार गोवा सरकार करत आहे. राज्यातल्या समुद्र किनाऱ्यांवर गेल्या काही दिवसांमध्ये पोहताना बुडाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोहण्यास निर्बंध घालण्याचा सरकार विचार करत आहे. गोव्याच्या समुद्रात बुडून मृत्यू पावणार्‍या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे ही बंदी घालण्याच्या विचारात सध्या गोवा सरकार आहे. मद्य प्राशन केल्यानंतर किंवा सूर्यास्तानंतर समुद्रात उतरण्यास बंदी घालणारा कायदा करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर आहे. या खेरीज पर्यटकांशी संबंध येणाऱ्या सगळ्या स्थानिकांनी पर्यटकांना काळोख पडल्यानंतर समुद्रात उतरण्यास मज्जाव करावा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. गोव्यातल्या सगळ्या बीचेसवर सूर्योदय ते सूर्यास्त या काळात लाइफगार्ड असतात, मात्र रात्री ते नसतात आणि याच वेळात पर्यटक बुडण्याची शक्यता जास्त असते.