शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
4
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
5
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
6
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
7
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
9
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
10
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
11
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
12
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
13
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
14
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
15
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
16
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
17
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
18
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
19
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
20
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
Daily Top 2Weekly Top 5

फक्त 250 रुपयांत 'रेनवॉटर हार्वेस्टिंग'; 'या' अवलियानं 10 मिनिटांत साठवलं 225 लिटर पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 16:40 IST

कडक उन्हाळ्यानंतर आलेल्या पावसाळ्यामुळे लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

चेन्नईः कडक उन्हाळ्यानंतर आलेल्या पावसाळ्यामुळे उकाड्यापासून लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. उन्हाळ्यात बऱ्याचदा सामान्यांना पाण्याचा प्रश्न भेडसावत असतो. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. अशातच चेन्नईच्या एका अवलियानं पाणी बचतीचा नवा फंडा वापरला आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून त्यानं 250 रुपयांत 10 मिनिटांत 225 लिटर पाणी वाचवलं आहे. चेन्नईतल्या दयानंद कृष्णन या अवलियानं हा अभिनव प्रयोग केला.दयानंद यानं पीव्हीसी पाइपचा उपयोग करून हे पाणी साठवलं आहे. दयानंद यानं छतावर जमा होणारं पावसाचं पाणी पीवीसी पाइपानं एका ड्रममध्ये सोडलं. अशा प्रकारे दयानंद यानं 10 मिनिटांत 225 लीटर पाणी साठवलं. पाणी वाचवण्याबरोबरच त्यानं ते स्वच्छ करण्याची पद्धतही शोधून काढली. ड्रममध्ये जाणाऱ्या पाइपमध्ये त्यानं फिल्टर बसवलं. जेणेकरून पाण्यातील घाण गाळून स्वच्छ पाणी ड्रममध्ये जाईल. चेन्नईमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यातच दयानंद कृष्णन यानं राबवलेला प्रयोग इतरांसाठी आदर्श ठरत आहे.

या पाण्यापासून लोक कपडे धुणे आणि भांडी घासण्याबरोबरच इतर कामं करू शकतात.  तर दुसरीकडे सबरी टेरेस या सोसायटीतील 56 कुटुंबीय रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून एका तासात 30 हजार लिटर पाणी साठवतात. त्यामुळे दयानंद यानं राबवलेला हा प्रयोग म्हणावा तेवढा खर्चिक नसला तरी पाणी साठवण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी