नवी दिल्ली - डिजिटल जगात डेटा सुरक्षेची चर्चा वाढली असली तरी, पासवर्ड निवडण्यात लोकांचा निष्काळजीपणा अजूनही कायम आहे. संशोधकांनी २०२५ मध्ये लीक झालेल्या २ अब्जाहून अधिक खात्यांच्या पासवर्डचे विश्लेषण केले असता त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. १०० सर्वांत सामान्य पासवर्डच्या यादीत ‘इंडिया @१२३’ हा ५३ व्या क्रमांकावर आहे. ‘१२३४५६’ हा एकटा पासवर्ड तब्बल ७६ लाख लोकांनी वापरला आहे.
दमदार पासवर्ड कसा ठेवाल? किमान १२–१६ अक्षरे वापरा. पासवर्ड जितका मोठा, तितका फोडणे कठीण असते. मोठी व लहान अक्षरे, अंक आणि विशेष चिन्हे वापरा. हे मिश्रण पासवर्ड गुंतागुंतीचा बनवते. सोपे शब्द, नाव, जन्मतारीख टाळा. प्रत्येक खात्यासाठी वेगळा पासवर्ड ठेवा. एकच पासवर्ड सर्वत्र वापरल्यास, एक खाते हॅक झाल्यास बाकी सर्व धोक्यात येतात.
सर्वांत सामान्य पासवर्ड कोणते?१. १२३४५६२. १२३४५६७८३. १२३४५६७८९४. admin५. १२३४६. Aai१२३४५६७. १२३४५8. Password९. १२३१०. १२३४५६७८९०
Web Summary : Millions use easily guessable passwords like '123456', risking data breaches. Experts advise strong, unique passwords with mixed characters for each account to enhance security.
Web Summary : लाखों लोग '123456' जैसे आसानी से अनुमान लगाने योग्य पासवर्ड का उपयोग करते हैं, जिससे डेटा उल्लंघन का खतरा है। विशेषज्ञ सुरक्षा बढ़ाने के लिए प्रत्येक खाते के लिए मिश्रित अक्षरों वाले मजबूत, अद्वितीय पासवर्ड की सलाह देते हैं।