चंदीगड : युवराज सिंगच्या घराचे गेट कोसळून ८ वर्षांचा मुलगा ठार

By Admin | Updated: April 22, 2016 12:47 IST2016-04-22T12:30:29+5:302016-04-22T12:47:51+5:30

क्रिकेटपटू युवराज सिंग याच्या निवासस्थानाचे गेट अंगावर पडल्याने एका ८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चंदीगडमध्ये घडली.

Chandigarh: The son of Yuvraj Singh's house collapsed and killed a boy of 8 years | चंदीगड : युवराज सिंगच्या घराचे गेट कोसळून ८ वर्षांचा मुलगा ठार

चंदीगड : युवराज सिंगच्या घराचे गेट कोसळून ८ वर्षांचा मुलगा ठार

ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. २२ - भारताचा झुंजार क्रिकेटपटू युवराज सिंग याच्या घराचे गेट अंगावर पडल्याने एका ८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. १९ एप्रिल रोजी ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघाता घडला तेव्हा युवराज व त्याची आई दोघेही घरी नव्हते. या घराच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने ते दोघेही गुरगाव येथील घरी रहात होते. दुरूस्तीच्या कामादरम्यान हे गेट पुन्हा बसवण्यात येत असतानाच त्या लहान मुलाच्या अंगावर पडले. त्या जखमी चिमुरड्याला उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
 

Web Title: Chandigarh: The son of Yuvraj Singh's house collapsed and killed a boy of 8 years