ठाकरे गटाच्या चिन्हाला आव्हान; दिल्ली उच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 05:56 IST2022-10-15T05:54:53+5:302022-10-15T05:56:26+5:30

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षासमोरील आव्हाने संपताना दिसत नाहीत.

challenge to shiv sena uddhav thackeray group election symbol samta party petition in delhi high court | ठाकरे गटाच्या चिन्हाला आव्हान; दिल्ली उच्च न्यायालयात याचिका

ठाकरे गटाच्या चिन्हाला आव्हान; दिल्ली उच्च न्यायालयात याचिका

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षासमोरील आव्हाने संपताना दिसत नसून या पक्षाच्या मशाल या चिन्हाला आता समता पार्टीने दिल्लीउच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

समता पार्टीचा अध्यक्ष असल्याचा दावा करणाऱ्या उदय मंडल यांनी ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. आमच्या पक्षाचा उमेदवार अंधेरी पूर्व मतदारसंघातही निवडणूक लढविणार होता. परंतु निवडणूक आयोगाने आमच्या पक्षाचे चिन्ह शिवसेनेला दिल्याने उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही, असे ते म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: challenge to shiv sena uddhav thackeray group election symbol samta party petition in delhi high court