शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रानं प्रदूषणावर नियंत्रणासाठी तातडीनं उपाययोजना करावी- सर्वोच्च न्यायालय

By admin | Updated: November 8, 2016 19:06 IST

दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणाची केंद्र सरकारनंही गंभीर दखल घेतली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 8 - दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणाची केंद्र सरकारनंही गंभीर दखल घेतली आहे. केंद्र सरकारनं राजधानीतल्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला गुरुवारपर्यंतची मुदत दिली आहे. दरम्यान मुख्य न्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आज तीन सदस्यांच्या खंडपीठासमोर दिल्लीतल्या प्रदूषणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली आहे. यासंदर्भात पुढील सुनावणीसाठी 10 नोव्हेंबरपर्यंची मुदत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिली आहे. केंद्रासोबत केजरीवाल सरकारलाही सर्वोच्च न्यायालयानं प्रदूषणाच्या मुद्द्यावरून फटकारलं आहे. या प्रकरणात विरोधी पक्षांसह सत्ताधा-यांनी राजकारण करू नये, अशी तंबीही सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे. राष्ट्रीय हरित लवादानं दिल्लीतल्या सर्व बांधकामांवर 7 दिवसांची बंदी घातली आहे. तत्पूर्वी दिल्लीत सोमवारीही धुरक्याच्या माध्यमातून प्रदूषणाचा स्तर काही भागात ११ पटहून जास्त नोंदवला गेला होता. हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्ली शेजारील चार राज्यांच्या पर्यावरणमंत्र्यांच्या बैठकीनंतर, केंद्रीय पर्यावरणमंत्री अनिल माधव दवे म्हणाले, या गंभीर समस्येसाठी परस्परांवर दोषारोप करून चालणार नाही. दिल्लीला प्रदूषणाच्या समस्येतून मुक्त करण्यासाठी वर्षांचे ३६५ दिवस सक्रिय राहावे लागेल. त्यामुळे दिल्लीतल्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी अखेर सर्वोच्च न्यायालयालाच हस्तक्षेप करावा लागला आहे.