शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाचा ममतांना दणका, नारदा स्टिंगचा तपास करणार सीबीआय

By admin | Updated: March 21, 2017 18:26 IST

नारदा स्टिंग प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयला न्यायालयानं मंजुरी दिली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 21 - बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सर्वोच्च न्यायालयानं जोरदार दणका दिला आहे. नारदा स्टिंग प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयला न्यायालयानं मंजुरी दिली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानं तृणमूलच्या नेत्यांची एसआयटीच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याची मागणी फेटाळून लावली आहे. नारदा स्टिंगमध्ये तृणमूलचे नेते कॅमे-यासमोर पैसे घेताना दिसत होते. यानंतर कोलकाता उच्च न्यायालयानं नारदा स्टिंग प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला तृणमूल काँग्रेसचे नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान तृणमूलच्या नेत्यांची याचिका फेटाळून लावली आहे. मात्र कोलकाता उच्च न्यायालयानं सीबीआयला 72 तासांच्या आत प्राथमिक चौकशीत निष्कर्ष काढण्याचे आदेश दिले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयानं ही मुदत वाढवून एक महिन्यांची केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं महिन्याभराच्या आत चौकशीचा निष्कर्ष काढण्याचे निर्देश दिले आहेत. कोलकाता पोलिसांद्वारे सुरू असलेली चौकशी थांबवून सीबीआय चौकशी करण्याचा कोर्टानं दिलेल्या निर्णयावर ममता बॅनर्जींनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हे स्टिंग ऑपरेशन भाजपानंच केल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केला आहे. 2016च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आधी नारदा स्टिंग ऑपरेशन उघड झालं होतं. त्यात तृणमूलचे नेते लाच घेताना दिसत होते. नारदा स्टिंग ऑपरेशन आयफोनच्या मदतीनं करण्यात आल्याचंही कोर्टात सांगण्यात आलं आहे.