मुख्यमंत्री जयललितांविरुद्ध खटला चालणारच

By Admin | Updated: June 18, 2014 05:26 IST2014-06-18T05:26:08+5:302014-06-18T05:26:08+5:30

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्याविरुद्ध बेहिशेबी संपत्तीप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीवरील स्थगिती आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली

The case against Chief Minister Jayalalithaa is going on | मुख्यमंत्री जयललितांविरुद्ध खटला चालणारच

मुख्यमंत्री जयललितांविरुद्ध खटला चालणारच

नवी दिल्ली : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्याविरुद्ध बेहिशेबी संपत्तीप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीवरील स्थगिती आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली.
न्यायालयाने खटल्याच्या सुनावणीला स्थगिती देण्याची मागणी करणारी जयललिता यांची याचिका रद्द केली. कनिष्ठ न्यायालयात लेक्स प्रापर्टी डेव्हलपमेंट प्रा. लि.च्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत या खटल्याच्या सुनावणीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी जयललिता यांची होती. काही संपत्ती मुख्यमंत्री जयललिता यांच्या मालकीची समजून ती बेहिशेबी असल्याचे दाखवण्यात आले आहे. वास्तविक ही संपत्ती जयललिता यांची नसून आपली आहे, असा दावा कंपनीचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याच्या सुनावणीला स्थगिती देण्याचा आपला आदेश मागे घेतला आहे. (वृत्तसंस्था)


 

Web Title: The case against Chief Minister Jayalalithaa is going on