शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमध्ये भाजपसोबत निवडणूक लढणार, PM मोदींनी शेतकऱ्यांची समस्या ओळखली; अमरिंदर सिंगांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 11:53 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले आणि त्याची समस्या समजून घेत कृषी कायदे रद्द केले. एवढेच नाही, तर 'मी हा मुद्दा सातत्याने उचलला आणि सरकारला भेटत राहिलो, असे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder singh) यांनी आनंद व्यक्त केला आहे. भाजपसोबत जागावाटप करून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. कृषीविषयक कायदे रद्द होताच आणि शेतकऱ्यांचे आंदोलन संपताच भाजपसोबत निवडणूक लढवणार असल्याचे कॅप्टन सिंग यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. महत्वाचे म्हणजे, आता साडेतीन महिन्यांनी राज्यात होणारी विधानसभा निवडणुका कॅप्टन भाजपसोबत लढवणार असल्याचेही निश्चित झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले आणि त्याची समस्या समजून घेत कृषी कायदे रद्द केले. एवढेच नाही, तर 'मी हा मुद्दा सातत्याने उचलला आणि सरकारला भेटत राहिलो, असे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.पीएम मोदींच्या घोषणेनंतर कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले, आज पंजाबमध्ये आमच्यासाठी मोठा दिवस आहे. मी हा मुद्दा एक वर्षाहून अधिक काळापासून उचलून धरला होता. यासंदर्भात, मी अनेक वेळा पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांना अन्नदात्या शेतकऱ्यांचा आवाज ऐकण्याची विनंती करत राहिले. त्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले आणि आमच्या समस्या समजून घेतल्या याचा खूप आनंद आहे.

पंजाबमधील प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यातील अश्रू पुसेपर्यंत आराम करणार नाही -कॅप्टन म्हणाले, हा शेतकर्‍यांसाठी तर मोठा दिलासा आहेच, पण पंजाबच्या प्रगतीचा मार्गही खुला झाला आहे. आता आपण भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारसोबत शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करणार आहोत. पंजाबमधील प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यातील अश्रू पुसल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असे आश्वासनही अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या शेतकर्‍यांना दिले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाबFarmers Protestशेतकरी आंदोलन