शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

राजधानीवर वर्चस्वासाठीचे रण दिल्लीत टिपेला

By admin | Updated: February 5, 2015 02:42 IST

अरविंद केजरीवाल भाजपचे एजंट आहेत. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांनी कुठेही धरणे आंदोलन केलेले नाही,

‘ते’ भाजपचेच एजंटनवी दिल्ली : अरविंद केजरीवाल भाजपचे एजंट आहेत. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांनी कुठेही धरणे आंदोलन केलेले नाही, या शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी जहांगीरपुरी येथील रॅलीत हल्लाबोल केला. काँग्रेसचे सरकार असताना दिल्लीत काहीही घडले तरी केजरीवाल धरणे-आंदोलन सुरू करायचे. बलात्काराची घटना घडली तरी केजरीवाल धरणे द्यायचे, मात्र आता दिल्लीत बलात्काराच्या घटनांत वाढ होऊनही ते चूप आहेत. नटराजन मुद्यावर भाष्यअलीकडेच काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या माजी पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांनी मोदी आणि भाजप सरकारच्या सांगण्यावरूनच काँग्रेसवर आरोप केले आहेत, असे सांगत राहुल गांधी यांनी प्रथमच या मुद्यावर भाष्य केले. गरीब आणि आदिवासींच्या कल्याणात रस असल्यामुळेच मी पर्यावरण जपतानाच गरीब आणि आदिवासींच्या कल्याणाकडे लक्ष देण्याची सूचना मी नटराजन यांना केली होती.गरीब आणि आदिवासींसाठी मी लढाई लढलो आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. गरीब ,झोपडपट्टीवासी आणि कमकुवत घटकांसाठी माझी लढाई सुरूच राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.मोदींचा १० लाखांचा सूट, ‘मेड इन युके’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारतभेटीवर आले तेव्हा परिधान केलेला १० लाखांचा सूट ‘मेक इन युके’ होता, असा उल्लेख राहुल गांधी यांनी केला. मोदीजी म्हणाले, रोजगार देणार. मेक इन इंडियाचा नाराही दिला. त्याचे मार्केटिंग करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्ची घातले. त्यातून काही निष्पन्न झाले काय, ते सांगा? मोदींनी १० लाख रुपयांचा सूट घातला. तो मेक इन इंडिया नव्हे तर मेक इन युके (ब्रिटन)होता, अशा बातम्या वृत्तपत्रात आल्या आहेत. तेच मोदी मेक इन इंडिया आणि रोजगाराच्या बाता करीत आहेत, असेही राहुल म्हणाले.इमोशनलभाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी बुधवारी एका रॅलीप्रसंगी भाऊक झाल्या. तुम्ही मला प्रेम द्या, मी त्याची पुरेपूर उतराई होेण्याचा प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.३२ लाखाची दारु दिल्लीत जप्तनवी दिल्ली : दिल्लीत पैसा आणि दारूचा खेळ सुरू झाला आहे. मतदारांना पैसे आणि दारूचे आमीष दाखविले जात असल्याचे आढळून आले. निवडणूक आयोगाच्या निगराणी पथकाने आतापर्यंत ३२ लाख रुपयांची रोख, ३४ हजार लिटर दारू व ३५ शस्त्रेही जप्त केली.