शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

ज्याच्या फेसबुक पेजला १५ हजार 'लाईक' त्यालाच विधानसभेचं तिकीट; काँग्रेसचं अजब फर्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 4:43 PM

भाजपाला टक्कर देण्यासाठी सोशल मीडियावर लक्ष केंद्रीत करण्यावर काँग्रेसकडून पावले उचलण्यात येत आहेत.

भोपाळ -  गेल्या 15 वर्षांपासून मध्य प्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपाला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे.  भाजपाला टक्कर देण्यासाठी सोशल मीडियावर लक्ष केंद्रीत करण्यावर काँग्रेसकडून पावले उचलण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून निवडणुकीतील उमेदवारीसाठी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणे कार्यकर्त्यांसाठी अनिवार्य करण्यात आले असून, ज्या कार्यकर्त्याचे फेसबूकवर 15 हजार लाइक्स आणि ट्विटरवर पाच हजार फॉलोअर्स असतील अशाच कार्यकर्त्याला विधानसभेचे तिकीट देण्यात येईल, असे फर्मान मध्य प्रदेश काँग्रेसने काढले आहे.  मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीने उमेदवारीसाठी इच्छुक असलेले नेते आणि कार्यकर्त्यांना एक पत्र लिहिले हे. या पत्रामध्ये निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक अटीशर्थींचा उल्लेख करण्यात आला आहे. इच्छुक उमेदरवारांच्या फेसबूक पेजला किमान 15 हजार लाइक्स आणि ट्विटरवर पाच हजार फॉलोअर्स असणे आवश्यक आहे. तसेच बूथ लेव्हल कार्यकर्त्यांचा एक व्हॉट्स अॅप ग्रुप असणे अनिवार्य आहे, अशा अटींचा उल्लेख या पत्रात आहे. 

 इतकेच नाही तर उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीने केलेल्या प्रत्येक पोस्टला रिट्विट करणेही आवश्यक असेल. उमेदवारीसाठी इच्छुक असलेले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत फेसबूक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपबाबचा तपशील 15 सप्टेंबरपर्यंत मध्य प्रदेश काँग्रेस समिती आणि आयटी विभागाला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  मध्य प्रदेशमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपाची सत्ता असून, या वर्षअखेरीस राज्यात निवडणूक होणार आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशFacebookफेसबुक