शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

आडनाव उघड करण्याची सक्ती करता येते का?

By admin | Updated: September 26, 2015 23:59 IST

नागरिकाने त्याच्या नावात आडनाव वापरलेच पाहिजे अथवा ते उघड करायलाच हवे, अशी सक्ती सरकार करू शकते का? तसेच अशी सक्ती राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करणारी आहे

नवी दिल्ली: नागरिकाने त्याच्या नावात आडनाव वापरलेच पाहिजे अथवा ते उघड करायलाच हवे, अशी सक्ती सरकार करू शकते का? तसेच अशी सक्ती राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करणारी आहे का, हा मुद्दा तपासून पाहण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे.निशांत एवढेच नाव लावणाऱ्या व्यक्तीने केलेल्या अपिलाच्या निमित्ताने हा विषय न्यायालयापुढे आला आहे. खंडपीठाने या प्रकरणी केंद्र सरकारला नोटीस काढली असून सहा आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.केंद्र सरकारच्या कंपनी व्यवहार मंत्रालयाने गेल्या वर्षी काढलेल्या परिपत्रकास निशांत यांनी आव्हान दिले आहे. ज्या नागरिकांना कंपनी स्थापन करून व्यापार करायचा असेल त्याने आपल्या अर्जात आडनावासह संपूर्ण नाव देण्याची सक्ती या परिपत्रकात करण्यात आली आहे. निशांत यांनी याआधी दिल्ली उच्च न्यायालयात रिट याचिका केली होती. ती फेटाळल्यानंतर आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे.निशांत यांचे वकील अ‍ॅड. गौरांग कांत यांनी असा युक्तिवाद केला की, कंपनी व्यवहार मंत्रालयाचे हे परिपत्रक राज्यघटनेच्या अनुच्छेद १९(१)(जी) अन्वये नागरिकांना दिलेल्या कोणताही व्यवसाय, व्यापार अथवा पेशा करण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. शिवाय ते समानता व मनाप्रमाणे जीवन जगण्याच्या (अनुच्छेद १४ व २१) मूलभूत हक्काचीही गळचेपी करणारे आहे. न्यायालच्या असेही निदर्शनास आणून दिले गेले की, निशांत यांना परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या पासपोर्टवर व प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या पॅनकार्डावरही त्यांचे आडनाव नाही. शिवाय खुद्द कंपनी व्यवहार मंत्रालयानेही त्यांना आडनावाचा उल्लेख न करता ‘डायरेक्ट आयडेन्टीटी नंबर’ जारी केला आहे. निशांत जी कंपनी सुरु करू इच्छितात त्यासाठी आवश्यक असलेली अर्हता त्यांच्याकडे आहे. मात्र तरीही आडनाव उघड करण्याच्या या सक्तीमुळे त्यांना आपल्या पसंतीचा व्यवसाय करण्यासाठी कंपनीची नोंदणी करता येत नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)निशांत यांच्या या अपिलावर सर्वोच्च न्यायालय जो काही निकाल देईल त्याचा केवळ कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या या परिपत्रकावरच नव्हे तर अनेक प्रकारचे व्यवहार करताना आडनावासह संपूर्ण नावाची सर्रासपणे सक्ती करणाऱ्या सरकारच्या इतर विभागांवर व कंपन्यांवरही परिणाम होईल. विशेषत: उपखंडीय भारतात आडनावे जात व सामाजिक दर्जा यांची निदर्शक अशी असतात. याविरुद्ध गेल्या शतकात एक आंदोलनही झाले होते. परिणामी अनेकांनी आडनावांचा त्याग केला. बिहारचे लालू प्रसाद हेही त्यापैकीच एक. २००२ ते २००४ या काळात भारताचे परराष्ट्र सचिवही ‘शशांक’ एवढेच नाव लावणारे अधिकारी होते.