फोन करा अन् एफआयआर नोंदवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 12:29 AM2018-09-17T00:29:37+5:302018-09-17T00:30:37+5:30

यूपीत पहिली योजना; पोलिसांना देणार २२ हजार नवे आयपॅड

Call or register an FIR | फोन करा अन् एफआयआर नोंदवा

फोन करा अन् एफआयआर नोंदवा

Next

नवी दिल्ली : सामान्य माणूस पोलिस ठाण्यात न जाताही गुन्ह्यांची तक्रार करू शकतो अशी देशातली पहिल्याच प्रकारची डायल-एफआयआर योजना उत्तर प्रदेश पोलीस लवकरच अमलात आणणार आहेत. त्याशिवाय पोलिसांना २२ हजार नवे आयपॅड देऊन त्यावर सुमारे १ लाख गुन्हेगारांची छायाचित्रांसहित सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाईल.
यासंदर्भात राज्याचे पोलिस महासंचालक ओ. पी. सिंग यांनी सांगितले की, दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी १०० नवीन कमांडोना प्रशिक्षित करण्यात येत आहे. त्यामध्ये महिला कमांडोंचीही एक तुकडी आहे. जोपर्यंत एखाद्या गुन्ह्याबद्दल तक्रार नोंदविली जात नाही तोवर त्याचा तपास सुरू होत नाही. उत्तर प्रदेशमध्ये १०० या दूरध्वनी क्रमांकावर दररोज २० हजार तक्रारी केल्या जातात.

आॅनलाईन अर्जाची सुविधा
हरवले आणि सापडले याबद्दलची तक्रार, मिरवणूकीसाठी परवानगी मिळवणे, कॅरॅक्टर सर्टिफिकेट अशा गोष्टींसाठी आता नागरिकांना पोलिस ठाण्यात यायची गरज नाही तर या साऱ्या सुविधा आॅनलाइन अर्ज भरून नागरिकांना मिळू शकतात. गुन्ह्यांची उकल जलद होण्याकरिता उत्तर प्रदेशमधील तपास अधिकाºयांना २२ हजार नवे आयपॅड गुन्हेगारांच्या माहितीसह देण्यात येईल. अशी सुविधा सर्वप्रथम पंजाबने दिली आहे.

Web Title: Call or register an FIR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.