शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कॅबिनेट सचिव अजित सेठ यांना आणखी मुदतवाढ

By admin | Updated: December 6, 2014 00:03 IST

एका असामान्य घडामोडीत मोदी सरकारने कॅबिनेट सचिव अजित सेठ यांना आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

नवी दिल्ली : एका असामान्य घडामोडीत मोदी सरकारने कॅबिनेट सचिव अजित सेठ यांना आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. सेठ यांना मुदतवाढ मिळण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी संपुआ सरकारने जून २०१३ मध्ये सेठ यांना सरसकट एक वर्षाची मुदतवाढ दिली होती. त्यानंतर त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. मोदी सरकारने तिसऱ्यांदा त्यांना मुदतवाढ दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने या मुदतवाढीला मंजुरी दिली आहे. या संदर्भातील औपचारिक आदेश १३ डिसेंबरला जारी केला जाईल. कॅबिनेट सचिवांना त्यांचा दोन वर्षांचा निर्धारित कालावधी पूर्ण झाल्यानंतर मुदतवाढ देण्यात असाधारण असे काहीच नाही, असे साऊथ ब्लॉकने म्हटले आहे. परंतु संपुआची पसंत असलेल्या एका आयएएस अधिकाऱ्यावर मोदी यांनी पुन्हा विश्वास व्यक्त केल्यामुळे नोकरशहांच्या भुवया उंचावल्या आहेत. तथापि कॅबिनेट सचिवपदाच्या शर्यतीत असलेल्या काही वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना संपविण्याच्या उद्देशानेच सेठ यांना ही मुदतवाढ देण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. सेठ यांना मुदतवाढ मिळाल्यामुळे वित्त सचिव राजीव महर्षि किंवा ऊर्जा सचिव पी. के. सिन्हा यांना जूनपर्यंत तरी कॅबिनेट सचिवपदाच्या शर्यतीत राहण्याची संधी मिळाली आहे; परंतु गृहसचिव अनिल गोस्वामी, पेट्रोलियम सचिव सौरभ चंद्रा, कंपनी कामकाज सचिव नावेद मासूद आणि अन्य अनेकांच्या कॅबिनेट सचिव बनण्याच्या आशा मावळल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील १९७४ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी असलेले सेठ १४ जून २०११ पासून कॅबिनेट सचिवपदावर आहेत. आणि १३ जून २०१३ पासून त्यांना सतत मुदतवाढ देण्यात येत आहे. ते येत्या १३ डिसेंबर रोजी निवृत्त होणार होते. (विशेष प्रतिनिधी)