शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

कॉ. पानसरे हल्ला निषेध - प्रतिक्रिया-३

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

प्रत्येक पुरोगामी कार्यकर्त्यावरील हल्ला

प्रत्येक पुरोगामी कार्यकर्त्यावरील हल्ला

गोविंदराव पानसरे महाराष्ट्र व देशातील विवेकी, सहिष्णू व धर्मनिरपेक्ष संस्कृतीचे तसेच कष्टकरी, कामकरी महिलांविषयक प्रश्न आणि राजकीय, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अशा सर्वांगीण समस्येच्या पुरोगामी लढ्याचे ज्येष्ठ प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील हा हल्ला महाराष्ट्राचा शाहू, फुले, आंबेडकर प्रणीत पुरोगाम्यांवर झालेला हल्ला आहे. आपण सारेच पुरोगामी, खरे तर पानसरेच आहोत. त्यामुळे हा हल्ला आपल्यापैकी प्रत्येकावरच आहे आणि त्याचा प्रत्येकाने तीव्र धिक्कार केला पाहिजे.
श्रीपाद भालचंद्र जोशी
संयोजक - महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी व प्रगतिशील लेख संघाचे महाराष्ट्राचे कार्यवाह

हल्ल्यामुळे लढाई थांबणार नाही

कॉ. गोविंद पानसरे यांच्यासारख्या वयोवृद्ध कम्युनिस्ट नेत्यावर झालेल्या भ्याडहल्ल्याचा कुणीही पुरोगामी विचारवंत धिक्कारच करेल. अद्याप या हल्ल्यामागचे खरे सूत्रधार गवसायचे असल्यामुळे कोणताही राजकीय निष्कर्ष घाईघाईने काढणे योग्य होणार नाही. पण एवढे मात्र नक्की की, ज्या धनदांडग्यांविरुद्ध आणि कट्टरवाद्यांविरुद्ध आयुष्यभर एल्गार केला त्यांच्याविरुद्ध ना पानसरे पती-पत्नींची लढाई थांबणार ना कम्युनिस्ट पक्षासह धर्मनिरपेक्षवाद्यांची लढाई थांबणार. मी पानसरे पती-पत्नी लवकर बरे होण्याची कामना करतो.

वि.स. जोग
ज्येष्ठ समीक्षक व विचारवंत

हल्ला निषेधार्हच

गोविंद पानसरे हे दलित, श्रमिक चळवळीतील प्रसिद्ध नेतृत्व आहे. पुरोगामी चळवळीचे ते खंदे पुरस्कर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर झालेला हा हल्ला निषेधार्हच आहे. भारतीय संविधानावर ज्यांचा विश्वास नाही, अशा लोकांनीच हा हल्ला घडवून आणला असावा, असा संशय असून सरकारने आरोपींना तातडीने अटक कारावी व शिक्षा ठोठवावी.
विलास भोंगाडे
संयोजक - गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती