शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कर्णकर्कश हॉर्नवर पोलिसांनी चालविला बुलडोझर (फोटो)

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

ग्रामीण वाहतूक शाखेची कारवाई

ग्रामीण वाहतूक शाखेची कारवाई
औरंगाबाद : ग्रामीण वाहतूक शाखेच्या वतीने महिनाभर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत हजारो वाहनांना नियमबाह्यपणे लावण्यात आलेले कर्णकर्कश हॉर्न जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या हॉर्नवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज १४ फेब्रुवारी रोजी बुलडोझर फिरविला.
परिवहन विभागाने प्रत्येक वाहनांच्या हॉर्नची क्षमता ठरवून दिलेली आहे. मात्र, बाजारात मिळणारे जास्त क्षमतेचे हॉर्न बसवून वाहनचालक सर्रास मिरवीत असतात. कानाचे पडदे फाडणारे हे हॉर्न बसविल्यास वाहनचालकास दंड करण्याची तरतूद आहे. औरंगाबाद ग्रामीण वाहतूक पोलिसांच्या वतीने नववर्षाच्या दुसर्‍या आठवड्यापासून कर्णकर्कश हॉर्नविरोधात विशेष मोहीम उघडली. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील विविध मार्गावर वाहनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईअंतर्गत कार, जीप, मोटारसायकलींसह सुमारे दोन हजार वाहनांना लावण्यात आलेले इलेक्ट्रिक प्रेशर हॉर्न जप्त करण्यात आले होते. वाहनचालकांकडून १ लाख ९६ हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रेशर हॉर्न वाजविल्याचे दुष्परिणाम अधिक आहेत. ही बाब लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाजीराव कुटे, सहायक उपनिरीक्षक शेलार, भाऊसाहेब जमधडे, जमादार गजानन लहासे, विनोद हजारी, संदीप दुबे, राहुल थोरात, गणेश जाधव यांनी ही कारवाई केली. जिल्ह्यातील विविध ठिकाणी जप्त करण्यात आलेले हॉर्न शनिवारी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाशेजारील गोकुळ स्टेडियम येथे आणून त्यांच्यावर बुलडोझर चालवून ते नष्ट करण्यात आले. त्यामुळे या हॉर्नचा पुन्हा कोणीही उपयोग करू शकणार नाही.