शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

जळालेली घरे बांधली; पण मनमर्जी जगता येत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 06:19 IST

भेदरलेले चेहरे : उत्तर प्रदेशातील भदेठीत दलित वस्तीवर जून २०२० मध्ये झाला होता हल्ला

- धनाजी कांबळेलाेकमत न्यूज नेटवर्कशाहगंज : आमची जळालेली घरे सरकारने बांधून दिली आहेत. पण आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार असतानाही प्रत्यक्षात दबावाखाली जगावे लागते, असं डोळ्यात डोळे घालून भदेठी येथील दलित वस्तीतल्या महिला सांगत होत्या. इतक्या दिवसांनंतरही चेहरे भेदरलेले आहेत. महिला डोळ्याला पदर लावतच बोलतात. सत्य सांगतानाही त्यांना मोठी हिंमत करावी लागते, हे त्यांच्या डोळ्यांत दिसत होतं. 

ज्यांचे घर जाळले गेले होते, ते फिरतू राम म्हणाले, शेळी चारण्यारून लहान मुलांना मारहाण करण्यात आली होती. त्याचा जाब विचारला म्हणून वाद वाढत गेला आणि अचानक रात्री आमच्या वस्तीतील घरांना आग लावण्यात आली. बायका, पोरं घाबरून जवळच्या वस्तीवर पळून गेले. आम्ही बरेच लोक सकाळीच शेतात गेलो होतो, त्यामुळे घरी येईपर्यंत आम्हाला काहीच कळलं नाही. 

उत्तर प्रदेशमधील जौनपूर जिल्ह्यातील भदेठी  येथे जून २०२० मध्ये मुलांमध्ये झालेल्या भांडणात मोठ्यांनी उडी घेतल्याने दलितांची घरे जाळण्यात आली होती. आज त्या गावातील पीडितांना घरे बांधून दिली आहेत, मात्र त्यांची जनावरे होरपळून मेली, ती काही परत मिळाली नाहीत.पोलिसांनी या प्रकरणात ३५ जणांना अटक केली होती. अजूनही त्याची केस सुरू आहे, पण प्रत्यक्षात आजही या गावात दोन्ही समाजांत तेढ आणि द्वेषाची भावना आहे. पीडित कुटुंबांना नुकसानभरपाईसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाखांची आर्थिक मदत सरकारने जाहीर केली होती. त्याचबरोबर मुख्यमंत्री आवास योजनेंतर्गत ७ पीडित कुटुंबांना घरे देण्याचे आश्वासन दिले होते, पण १ लाख ७४ हजार रुपये मिळाले होते. त्यात कर्ज काढून आणखी रक्कम घातली आणि घर बांधले, असे फितूर राम म्हणाले. १५ दिवस वस्तीवर भीतीचे वातावरण होते. कुणी वस्तीवर यायला तयार नव्हते. पुन्हा हल्ला झाला तर काय करायचे, असा प्रश्न होता. पण, हळूहळू भीती कमी झाल्यावर एकेक कुटुंब वस्तीवर परत आले, असे आशादेवी यांनी सांगितले.

निवडणुकीपेक्षा आम्हाला रोजीरोटीची भ्रांत     आमच्या राज्यात निवडणूक आहे. मोठमोठ्या गाड्या भुर्रर्र येतात आणि धूळ उडवून निघून जातात. आम्ही सगळ्यांनाच माना डोलवतो, पण निवडणूक येते आणि जाते.     आमच्यासमोर निवडणुकीपेक्षा रोजीरोटीचा प्रश्न महत्त्वाचा आहे, असं बारावीपर्यंत शिकलेली फितूर राम यांची सून म्हणाली आणि जमलेल्या सगळ्या महिलांनी माना डोलवून सहमती दर्शविली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश