शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डी येथील पीडित कुटुंबाने घेतली उज्ज्वल निकम यांची भेट भय्यूजी महाराजही उपस्थित : सव्वातास चर्चा, न्याय मिळण्याची मागणी

By admin | Updated: September 13, 2016 23:59 IST

जळगाव : कोपर्डी (नगर) येथील पीडित मुलीची आई, बहीण व मामा यांच्यासह भय्यूजी महाराज यांनी मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शहरात राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्यात सुमारे सव्वातास चर्चा झाली.

जळगाव : कोपर्डी (नगर) येथील पीडित मुलीची आई, बहीण व मामा यांच्यासह भय्यूजी महाराज यांनी मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शहरात राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्यात सुमारे सव्वातास चर्चा झाली.
त्यांच्यात काय चर्चा झाली याचा तपशील भय्यूजी महाराज व ॲड.निकम यांनी सांगण्याबाबत नकार दिला. परंतु पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबत अधिकचे बोलणे योग्य होणार नाही, असे भय्यूजी महाराज यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले.
सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भय्यूजी महाराज व कोपर्डी येथील पीडित मुलीचे नातेवाईक ॲड.निकम यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यानंतर त्यांची ॲड.निकम यांच्यासोबत बंदद्वार चर्चा झाली.

मी पीडितेचा भाऊ म्हणून आलो
निकम यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर भय्यूजी महाराज यांनी पत्रकारांशी निकम यांच्या निवासस्थानी वार्तालाप केला. त्यात ते म्हणाले, कोपर्डी येथील पीडितेचा भाऊ म्हणून मी निकम यांची भेट घेण्यासाठी आलो. निकम यांना भेटण्यासाठी पीडितेच्या कुटुंबतील कोण कोण आले हे सांगण्यास मात्र भय्यूजी महाराज यांनी नकार दिला.

पीडितेेचे कुटुंबीय भय्यूजी महाराज यांच्यासोबत
पुढे भय्यूजी महाराज म्हणाले, कोपर्डी येथील पीडित मुलीचे कुटुंबीयांना असुरक्षित वाटत होते. त्यांना स्वास्थ्याची गरज होती. पीडितेचे कुटुंबीय माझ्यासोबत राहतात. या कुटुंबाला बाहेरच्या जगाची माहिती नाही. त्यांची असुरक्षितता दूर व्हावी, सामान्य वातावरण त्यांच्यात असावे, असे मला वाटते. कोपर्डीच्या घटनेसारखा प्रसंग माझी बहीण, मुलगी यांच्याबाबत घडला असता तर काय झाले असते हा विचार मी करतो. कुठल्याही अन्यायग्रस्त, अत्याचारग्रस्त कुटुंबाला मदत करण्याची आपली भूमिका, वृत्ती आहे, असेही भय्यूजी महाराज यांनी स्पष्ट केले.

सायबर सेक्स संकल्पना आणून नियंत्रण करावे
लैंगिक शिक्षणाची गरज विद्यार्थ्यांना नाही. कारण बलात्कार करणार्‍यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या फारशी नाही. परंतु पोर्न बेवसाईटबाबत नियंत्रण व्हावे. सायबर सेक्स संकल्पनेतून या पोर्न वेबसाईटवर नियंत्रण करता येईल, असा दावा भय्यूजी महाराज यांनी केला.

कोपर्डी येथे विद्यार्थिनींसाठी चार वाहने
कोपर्डी येथील घटनेनंतर मी तेथे विद्यार्थिनींची ने-आण करण्यासाठी चार वाहने दिली. मेसेज अलर्टस्ची संकल्पना सुरू केली. सीसीटीव्हीची व्यवस्था करून दिल्याचेही भय्यूजी महाराज म्हणाले.