शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 12:18 IST

एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या या तरुणाने लग्नाआधी मुलीचे प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. एवढंच नाही तर त्याने तिला मंडपातून उचलून घेऊन जाण्याची धमकीही दिली.

उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या या तरुणाने लग्नाआधी मुलीचे प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. एवढंच नाही तर त्याने तिला मंडपातून उचलून घेऊन जाण्याची धमकीही दिली. घाबरलेल्या मुलीच्या कुटुंबाने पोलिसांची मदत मागितली.  लग्नासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

कौशांबीच्या पश्चिम शरीरा पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात ही घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या एका तरुणाने एका मुलीचे प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. तरुणाने मुलीच्या सासरच्या लोकांनाही अनेक वाईट गोष्टी सांगितल्या. तसेच त्याने मुलीला मंडपातून पळवून नेण्याची धमकीही दिली. यामुळे मुलीचं कुटुंब खूप जास्त घाबरलं.

वडिलांना एसपी ब्रिजेश कुमार श्रीवास्तव यांची मदत घ्यावी लागली. हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी गावात मोठा बंदोबस्त तैनात केला. लग्नाचे सर्व विधी पोलिसांच्या देखरेखीखाली पार पडले आणि त्यानंतर मुलीची पाठवणी करण्यात आली. मंडपातही कडक पोलीस बंदोबस्त होता. मुलीचं लग्न झाल्यानंतर वडिलांनी आणि कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले.

या प्रकरणात सीओ अभिषेक सिंह म्हणाले की, पश्चिम शरीरा पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात राहणाऱ्या कुटुंबाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. असं सांगितलं जात होतं की, गावातील एक तरुण त्यांच्या मुलीच्या लग्नात अडचणी निर्माण करत होता आणि तिच्या सासरच्यांना तिच्याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगत होता. मिळालेल्या तक्रारीच्या आधारे, गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. कोणत्याही प्रकारची घटना घडू नये म्हणून लग्नाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. लग्न सुरक्षितपणे पार पडलं. आता पुढील कारवाई केली जात आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारी