वराला पैसे मोजता न आल्याने वधूने लग्न मोडले

By Admin | Updated: May 3, 2015 16:39 IST2015-05-03T16:33:50+5:302015-05-03T16:39:17+5:30

पैसे मोजता न आल्याने उत्तरप्रदेशमधील बलिया येथे लग्नमांडवातच वराशी विवाह करण्यास नकार दिल्याची घटना घडली आहे.

The bride broke the marriage because she did not count the money | वराला पैसे मोजता न आल्याने वधूने लग्न मोडले

वराला पैसे मोजता न आल्याने वधूने लग्न मोडले

ऑनलाइन लोकमत 

बलिया, दि. ३ - पैसे मोजता न आल्याने उत्तरप्रदेशमधील बलिया येथे लग्नमांडवातच वराशी विवाह करण्यास नकार दिल्याची घटना घडली आहे. वधूच्या या निर्णयानंतर वरपक्षातील मंडळींनी गोंधळ घालण्याचा प्रयत्नही केला. मात्र वधू तिच्या निर्णयावर ठाम राहिल्याने वर पक्षातील मंडळींना रिकाम्या हातीच स्वगृही परतावे लागले. 
बलिया येथे राहणा-या तरुणीचे बिहारमधील तरुणाशी लग्न ठरले होते.लग्नाच्या दिवशी वरात मोठ्या दिमाखाने लग्नमंडपात दाखल झाली. लग्नाच्या विधीलाही सुरुवात झाली होती. मात्र तेवढ्यात वधूला वर निरक्षर असल्याचा संशय आला. तिने लग्न थांबवून मुलाला पैसे मोजण्यास सांगितले. मात्र तो मुलगा यात असमर्थ ठरल्याने मुलीने लग्न करण्यास नकार दिला. धाडस दाखवणारी तरुणी ही पदवीधर असून मुलगा निरक्षर असल्याचे तिला व तिच्या कुटुंबीयांना सांगितले नव्हते असे सूत्रांनी सांगितले. वधूच्या या निर्णयानंतर गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. शेवटी पंचायतीमध्ये हे प्रकरण गेले व पंचायतीने वधूच्या बाजूने कौल दिला. 

Web Title: The bride broke the marriage because she did not count the money