शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट मालासाठी ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसेडर’ला तुरुंगवास?

By admin | Updated: August 22, 2016 05:33 IST

वस्तूंची जाहिरात करतात त्या चाचणीमध्ये निकृष्ट दर्जाच्या आढळल्यास या ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसेडर’ना तुरुंगात जावे लागेल

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या विचाराधीन असलेला एक नवा कायदा मंजूर झाल्यास तुमचे लाडके सिने कलावंत आणि खेळाडू ज्या वस्तूंची जाहिरात करतात त्या चाचणीमध्ये निकृष्ट दर्जाच्या आढळल्यास या ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसेडर’ना तुरुंगात जावे लागेल.१९८६ च्या ग्राहक संरक्षण कायद्यात आमुलाग्र सुधारणा करण्यासाठी ‘ग्राहक संरक्षण विधेयक’ नावाचे एक नवे विधेयक केंद्र सरकार तयार करीत असून त्यात निकृष्ठ मालाची जाहिरात करणाऱ्या ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर’ना पहिल्या गुन्ह्यासाठी दोन वर्षांच्या व नंतरच्या गुन्ह्यासाठी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षेच्या तरतुदीचा विचार आहे.अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने या दुरुस्ती विधेयकाचा मूळ मसुदा तयार केला होता. गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये हे विधेयक लोकसभेत मांडले गेल्यावर ते संसदीय स्थायी समितीकडे पाठविले गेले होते. समितीने इतर बाबींसोबत निकृष्ठ मालाची जाहिरात करणाऱ्या ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसेडर’ना शिक्षा करण्याची शिफारस केली होती. समितीच्या या शिफारशींसह या विधेयकावर सर्व संबंधितांशी व्यापक सल्लामसलत करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाकडे हे विधेयक मतासाठी पाठविले गेले. या मंत्रीगटात जेटली यांच्याखेरीज रस्ते वाहतूकमंत्री नितिन गडकरी, आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा, अन्न आणि ग्राहक व्यवहारमंत्री राम विलास पासवान आणि कृषीमंत्री राधा मोहन सिंग यांचा समावेश होता. आता या मंत्रीगटानेही ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसेडर’ना शिक्षा करण्याच्या तरतुदीस अनुकुलता दर्शविली असल्याचे समजते. (लोकमत न्यूज नेटवर्क)>धोनी, माधुरीचा अनुभवदिल्ली राजधानी परिक्षेत्रात बांधल्या गेलेल्या आम्रपाली गृहनिर्माण प्रकल्पाच्या जाहिरातीत क्रिकेटपटू एम. एस. धोनी ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसेडर’ होता. या वसाहतीमधील घरे कशी आरामदायी व आलिशान आहेत याची तोंडभरून स्तुती करताना जाहिरातीत धोनीला दाखविले गेले होते. प्रत्यक्षात घरे घेतल्यावर अनेक ग्राहकांचा भ्रमनिरास झाल्यावर त्यांनी समाजमाध्यमांवर टिकेची झोड उठविली होती.>बॉलिवूडची अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने मॅग्गी नूडल्सची जाहिरात केली होती. शिशाचे प्रमाण मर्यादेहून जास्त असल्याच्या संशयावरून या नूडल्स काही महिने बाजारातून काढून घेतल्यानंतर माधुरीबद्दलही अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.