आपल्या देशात आरक्षण, या मुद्द्यावर नेहमीच चर्चा होत असते. विविध समाजांकडून अधूनमधून यासाठी मागण्याही होत असतात. आंदोलनेही केली जातात. आता, एक निवृत्त IAS अधिकारी नियाज खान यांनी ब्राह्मण समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात भाष्य केले आहे. 'ब्राह्मण समाजाला सर्व योजनांमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळायला हवे,' असे नियाज खान यांनी म्हटले आहे. ते मध्य प्रदेश कॅडरचे निवृत्त IAS अधिकारी आहेत. ते आपली पुस्तके आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात.
नियाज खान 'एक्स'वर लिहिलेल्या आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, "ब्राह्मण समाज हजारो वर्षांपासून सनातन धर्माचा रक्षक आहे. यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास आवश्यक आहे. त्यांना त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे आरक्षण द्यायला हवे. त्यांना सर्व योजनांतही आरक्षण मिळायला हवे. जर ब्राह्मण समाज बलशाली झाला तर, देश बलशाली होईल. धर्म आणि अध्यात्माला बळकटी मिळेल. आरक्षण देण्यासंदर्भात गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे."
Web Summary : Retired IAS officer Niaz Khan advocates for reservation for Brahmins proportionate to their population, emphasizing their role as protectors of Sanatan Dharma. He believes empowering Brahmins strengthens the nation, religion, and spirituality, sparking mixed reactions.
Web Summary : सेवानिवृत्त आईएएस अधिकारी नियाज़ खान ने ब्राह्मणों को उनकी जनसंख्या के अनुपात में आरक्षण देने की वकालत की, सनातन धर्म के संरक्षक के रूप में उनकी भूमिका पर जोर दिया। उनका मानना है कि ब्राह्मणों को सशक्त बनाने से राष्ट्र, धर्म और आध्यात्मिकता मजबूत होगी, जिससे मिली-जुली प्रतिक्रियाएं सामने आ रही हैं।