शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

अमृतसमध्ये निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला; तीन ठार; दोघे संशयित ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 12:55 PM

 पंजाबमधील एका गावात असलेल्या निरंकारी भवनाला लक्ष्य करून बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला.

अमृतसर -  पंजाबमधील राजासांसी परिसरात रविवारी दुपारी अज्ञात हल्लेखोरांनी ग्रेनेड फेकून घडवून आणलेल्या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला असून, 20 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काही जणांचा प्रकृती चिंताजनक आहे. अमृतसर जिल्ह्यातील राजासांसी परिसरात असलेल्या आदिलावाल गावातील निरंकारी भवनाला लक्ष्य करून हा स्फोट घडवून आणण्यात आला. 

येथील निरंकारी भवनामध्ये दर रविवारी सत्संगाचे आयोजन करण्यात येते. त्याप्रमाणे आजही येथे सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात तरुणांनी मंचाच्या दिशेने बॉम्ब फेकला. त्यामुळे झालेल्या स्फोटात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोटारसायकलवर कोणताही क्रमांक नव्हता. तर संशयितांनी आपला चेहरा काळ्या कापडाने झाकला होता. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी गोंधळ माजला. तसेच धावपळ सुरू झाली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. राजासांसी गावातील निरंकारी भवनात झालेल्या या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला असून, 20 जण जखमी झाले आहेत अशी अधिकृत माहिती, आयजी (सरहद्द) सुरिंदर सिंह परमार यांनी दिली. 

टॅग्स :PunjabपंजाबBlastस्फोट