शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

नगरोत्थान रस्त्याचा ठेका आवताडेंकडे धाडसी निर्णय: युनिटीचा फेरप्रस्ताव नाकारला

By admin | Updated: July 7, 2015 22:56 IST

सोलापूर :

सोलापूर :
तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या निर्णयाचे समर्थन करीत आयुक्त विजयकुमार काळम—पाटील यांनी स्थायी समितीने केलेला ठराव अमान्य करीत नगरोत्थान योजनेतील २७ कोटी २७ लाखांच्या तीन रस्ते कामांचा ठेका आवताडे कन्स्ट्रक्शनला देण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.
नगरोत्थान योजनेतील २३८ कोटींच्या रस्ते कामांचा ठेका युनिटी कन्स्ट्रक्शनला देण्यात आला होता. रस्त्यांची कामे निकृष्ट झाल्याने तत्कालीन आयुक्त गुडेवार यांनी युनिटीचा ठेका रद्द केला व तुकडे करून रस्त्यांची कामे काढली. दरम्यान त्यांची बदली झाल्यावर स्थायी समितीचे तत्कालीन सभापती बाबा मिस्त्री यांच्या कालावधीत नगरोत्थानमधील उर्वरित रस्त्यांचा ठेका युनिटीलाच द्यावा असा ठराव करण्यात आला.
पण आयुक्त काळम—पाटील यांनी हा ठराव अमान्य करून रस्त्यांचे नवीन टेंडर काढले. त्यात मुळेगाव रोड ते केकडेनगर, सद्गुरू हॉस्पिटल, विठाई मंदिर ते चेतन फौंड्री, जिल्हा औद्योगिक केंद्र ते होटगी रोड (काम: १0 कोटी ६३ लाख), कस्तुरबा मंडई ते तुळजापूर वेस, कुंभारवेस ते कोंतम चौक (८ कोटी १९ लाख) आणि पुणे रोड ॲम्बेसिडर हॉटेल ते आडवा नळ, शरदचंद्र प्रशाला ते अरविंद धाम, जुना विजापूर नाका ते सोनीनगर, मोदी (८ कोटी ४५ लाख) या कामांचा समावेश आहे. मक्तेदार एस. एम. आवताडे यांनी डीसीआरच्या दरापेक्षा ७.११ टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शविल्याने करारपत्र करून वर्कऑर्डर देण्याचा विषय आयुक्तांनी शुक्रवारी होणार्‍या स्थायी समितीकडे पाठविला आहे. मंडईचे विभागाचे खाजगीकरण, लोकसेवा हक्क अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी विहित केलेल्या शुल्कास मान्यता देण्याचे विषय सभेसमोर आहेत.
कोट...
टेंडर प्रक्रियेत डीसीआरपेक्षा ७ टक्के दराने काम करण्यास नवीन ठेकेदाराने तयारी दर्शविली आहे. यात महापालिकेचे हित असल्याने कमी खर्चात काम करणार्‍यास ठेका देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
विजयकुमार काळम—पाटील
आयुक्त, महापालिका