्रपोहायला गेलेल्या मुलाचा उरमोडी जलाशयात बुडून मृत्यू वेणेखोल येथील घटना : पाच तासांनंतर मृतदेह सापडला
By admin | Updated: May 12, 2014 20:56 IST
परळी : गावातील मुलांबरोबर उरमोडी जलाशयात पोहायला गेलेल्या अल्पेश राजेंद्र मोरे (वय ९) या चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवार (दि. ११) रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली.
्रपोहायला गेलेल्या मुलाचा उरमोडी जलाशयात बुडून मृत्यू वेणेखोल येथील घटना : पाच तासांनंतर मृतदेह सापडला
परळी : गावातील मुलांबरोबर उरमोडी जलाशयात पोहायला गेलेल्या अल्पेश राजेंद्र मोरे (वय ९) या चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवार (दि. ११) रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली.अल्पेश आईवडीलांसोबत मुंबई (डांेबिवली) येथे वास्तव्यास आहे. त्यांचे मूळगाव सायळी आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या भावकीतील एकाचे लग्न होते. त्यासाठी सर्वजण गावी आले आहेत. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर अल्पेश आईबरोबर वेणेखोल येथे राहणार्या मामाकडे गेला. दरम्यान, रविवारी दुपारी अल्पेश वेणेखोल गावातील इतर मुलांसोबत क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळून झाल्यानंतर सर्व मुले उरमोडी जलाशयात पोहण्यासाठी उतरली. अल्पेशला पोहता येत नव्हते. त्यामुळे तो जलाशयाच्या काठावर उभे राहून स्वत:च्या अंगावर पाणी मारत होता. तर इतर मुले जलाशयात पोहण्यात दंग झाली होती. सुमारे अर्धातास पोहून झाल्यानंतर सर्व मुले घरी निघाली. वाटेत गेल्यानंतर अल्पेश नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी गावातील काही लोकांना याची माहिती दिली. ग्रामस्थांनी जलाशयाकडे धाव घेतली असता, जलाशयाच्या काठावर अल्पेशचे कपडे आणि सँडल सापडले. त्यामुळे तो जलाशयातच बुडाल्याचे निष्पन्न झाले. गावातील काही पीच्या पोहण्यार्या युवकांना बोलावून अल्पेशचा शोध घेण्यात आला. रात्री आठच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला.अल्पेशचा जलाशयात बुडून मृत्यू झाल्यामुळे त्याच्या आईवडिलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. डोंबिवली येथे अल्पेश चौथीत शिकत होता. त्याला सात वर्षांचा लहान भाऊ आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली नव्हती. (वार्ताहर)- अधिक वृत्त हॅलो १ वर