शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सातवेत शेतकर्‍यावर खुनी हल्ला

By admin | Updated: January 14, 2015 23:57 IST

देवाळे : (वार्ताहर) सातवे (ता. पन्हाळा) येथील सदाशिव तुकाराम पानसकर या शेतकर्‍यांच्या शेतजमिनीच्या नुकसानीवरून मुख्याध्यापक असलेल्या शशिकांत जगन्नाथ मोरे (रा. सातवे, ता. पन्हाळा) याने पानसकर यांच्या डोक्यात कुर्‍हाडीचे घाव घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सदाशिव पानसकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी मुख्याध्यापक शशिकांत मोरे यांच्यावर कोडोली पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, मोरे यास पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे.

देवाळे : (वार्ताहर) सातवे (ता. पन्हाळा) येथील सदाशिव तुकाराम पानसकर या शेतकर्‍यांच्या शेतजमिनीच्या नुकसानीवरून मुख्याध्यापक असलेल्या शशिकांत जगन्नाथ मोरे (रा. सातवे, ता. पन्हाळा) याने पानसकर यांच्या डोक्यात कुर्‍हाडीचे घाव घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सदाशिव पानसकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी मुख्याध्यापक शशिकांत मोरे यांच्यावर कोडोली पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, मोरे यास पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे. याबाबत कोडोली पोलिसांत व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, सातवे येथील विलास आम्ब्रे व जखमी सदाशिव पानसकर यांचे ऊस क्षेत्र एकमेकांच्या शेजारी असून, विलास आम्ब्रे यांच्या शेतामध्ये ऊसतोडणी चालू होती. सदर शेतातील ऊस पानसकर यांच्या शेतजमिनीमधून जात होता. पानसकर यांनी आपल्या शेतातील पिकास पाणी पाजले असल्याने पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी शेतामधून ऊस वाहतुकीस नकार दिला. पानसकर आणि आंम्बे्र शेतजमिनीचा वाद समजताच ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टरमालक मुख्याध्यापक शशिकांत मोरे यांनी सदर घटनेचा जाब विचारणेस घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी शाब्दिक बाचाबाची होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाणेचा प्रकार घडताच मुख्याध्यापक शशिकांत मोरे याने अचानक कुर्‍हाडीने प्राणघातक वार केला. त्यात पानसकर हे गंभीररित्या जखमी झाले. त्यावेळी मोरे याने तेथून पळ काढली. दरम्यान, पानसकर यांचे नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांना गाडीतून कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबतची फिर्याद पानसकर यांचा मुलगा संदीप पानसकर याने कोडोली पोलिसांत दिली असून, मुख्याध्यापक मोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कोडोली पोलीस ठाण्याचे स. पो. नि. शरद मेमाने यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली. मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अर्जुन घनवट पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे पन्हाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे. फोटो किरण जाधव या मेलवरून जखमी पानसकर यांचा फोटो पाठविला आहे..