शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाचे पहिले सरकार नजरेत

By admin | Updated: December 24, 2014 02:08 IST

भारतीय जनता पार्टीची कामगिरी झारखंडमध्ये स्वत:च्या बळावर सरकार स्थापन करता येईल एवढी चांगली झाली आहे

हरीश गुप्ता, नवी दिल्लीभारतीय जनता पार्टीची कामगिरी झारखंडमध्ये स्वत:च्या बळावर सरकार स्थापन करता येईल एवढी चांगली झाली आहे; परंतु जम्मू आणि काश्मीरमध्ये मात्र तिचे ‘मिशन ४४’ यशस्वी न होता ८७ जागांच्या विधानसभेत अवघ्या २५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तरीही या दोन्ही राज्यांमध्ये भाजपाच्या जागा दुपटीपेक्षा जास्त झाल्या.भाजपाला मिळालेल्या २५ जागा या हिंदूबहुल जम्मूतील आहेत. आता त्याला एक तर भ्रष्ट नॅशनल कॉन्फरन्स (जागा १५ अधिक २ अपक्ष) आणि सज्जाद लोण (जागा अवघ्या २) यांच्याशी हातमिळवणी करावी लागेल किंवा २८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनलेल्या मुफ्ती मोहंमद सईद यांच्या पीडीपीशी. पीडीपीच्या जागा या काश्मीर खोऱ्यातील मुस्लिमबहुल भागातील आहेत.भाजपासाठी आनंदाची बाब अशी की, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती असो वा मिर्झा अफजल बेग असो, या नेतृत्वाने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारबरोबर राहायला आमचे प्राधान्य असेल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. भाजपाचे नेते राम माधव दिवसभर दूरचित्रवाणी वाहिन्यांवर हे निकाल आमच्या अपेक्षेपेक्षा कमी आहेत असे सांगत होते; परंतु ओमर अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सबरोबर हातमिळवणी करण्याऐवजी पीडीपीबरोबर काम करायला प्राधान्य देईल, असे राम माधव म्हणत होते. दुसरीकडे ओमर अब्दुल्ला यांनीदेखील अनेक मुलाखती देऊन भाजपाशी हातमिळवणी करायला आम्हालाही आवडेल (पण आमच्याशी संपर्क साधला तर) असे संकेत दिले होते. काँग्रेसचे १२ आमदार असून स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी त्यांचा काही उपयोग नाही त्यामुळे मुफ्ती यांना मोदी किंवा शहा यांना फोन करून सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचे सांगावे लागेल हे उघड आहे.