जंगलातच...! तृणमूलचा नेता अन् भाजपची महिला नेता कारमध्ये दारू पित बसलेले; स्थानिकांनी पकडले तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 09:26 IST2025-07-11T09:25:46+5:302025-07-11T09:26:28+5:30

BJP-TMC Liquor Party: पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी येथील रात्री उशिरा घडलेला हा प्रकार आहे. दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते दारुची पार्टी करत असल्याने आता वाद सुरु झाला आहे.

BJP-TMC Liquor Party In the forest...! Trinamool leader and BJP woman leader deepa Adhikari sitting in a car drinking alcohol; If caught by locals... | जंगलातच...! तृणमूलचा नेता अन् भाजपची महिला नेता कारमध्ये दारू पित बसलेले; स्थानिकांनी पकडले तर...

जंगलातच...! तृणमूलचा नेता अन् भाजपची महिला नेता कारमध्ये दारू पित बसलेले; स्थानिकांनी पकडले तर...

काही महिन्यांपूर्वी हायवेवरच कारमधून बाहेर येत एका राजकीय नेत्याचा महिलोसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा नेता आणि भाजपच्या महिला नेत्याचा जंगलात कारमध्ये बसून दारू पितानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. स्थानिकांनी बराच वेळ कार कोणाची उभी आहे हे पाहिले असता ही राजकीय भेसळपार्टी पाहून मोठा गोंधळ घातला. लोकांना भडकवून हे दोन पक्षांचे नेते मस्त पार्टी करत बसले होते. लोकांनी पाहताच तिने हळूच आपले ग्लास पुढच्या सीटवर सरकवले व दुसऱ्या गाडीत बसून हळून निघून गेली. नंतर तृणमूलच्या नेत्याची आणि त्याच्या चालकाची चांगलीच पंचायत झाली होती.  

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी येथील रात्री उशिरा घडलेला हा प्रकार आहे. दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते दारुची पार्टी करत असल्याने आता वाद सुरु झाला आहे. सुनसान जंगलात बराच वेळ झाला कार उभी होती. ग्रामस्थांनी येता-जाता ही कार पाहिली आणि त्यांना संशय आला, म्हणून फोनाफोनी करून या कारकडे सगळे जमा झाले. त्यांनी कारमधून खाली उतरण्यास सांगितले, पाहिले तर भाजपा महिला मोर्चाची जलपाईगुडी जिल्हा अध्यक्षा दिपा बनिक अधिकारी त्या कारमध्ये बसलेली होती. तिच्यासोबत त्या कारमध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते पंचायत समिति अध्यक्ष पंचानन रॉय हे देखील होते. 

ही परस्पर आणि कट्टर विरोधी राजकीय भेसळ पाहून ग्रामस्थांचे डोकेच सनकले. त्यांनी या घटनेचा व्हिडीओ बनविला आणि व्हायरल केला. या व्हिडिओनुसार महिला नेता दिपा या मागच्या सीटवर बसलेल्या होत्या. त्यांच्या हातात ग्लास होते, ग्रामस्थांनी पकडताच त्यांनी ते ग्लास पुढच्या सीटकडे सरकवले. कारमध्ये एक ड्रायव्हरही होता. त्याने काचा वर केल्या. यानंतर दिपा अधिकारी या कारमधून उतरल्या आणि मागून आलेल्या एका कारमध्ये बसून निघून गेल्या. ग्रामस्थांनी काही काळ 
टीएमसी नेता रॉय आणि त्याच्या चालकाला अडवून ठेवले होते. नंतर सोडून देण्यात आले. 

या प्रकारानंतर तिथून काढता पाय घेतलेल्या दिपा अधिकारी यांनी सांगितले की, हा आपल्याला अडकविण्यासाठी रचलेला सापळा होता. राजकीय कट होता. तर दुसरीकडे भाजपाने आणि टीएमसीने देखील यावर काही बोलण्यास नकार दिला आहे. दोन्ही पक्षांचे नेते या दारु पार्टीवर गप्प राहिले आहेत. 

Web Title: BJP-TMC Liquor Party In the forest...! Trinamool leader and BJP woman leader deepa Adhikari sitting in a car drinking alcohol; If caught by locals...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.