शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये भाजपाचा आज शपथविधी

By admin | Updated: March 15, 2017 00:58 IST

मणिपूरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला नागा पीपल्स फ्रंटचीही (एनपीएफ) साथ मिळाल्याने एन. बिरेन सिंग यांना उद्या शपथविधीसाठी बोलावण्यात येईल

इम्फाळ : मणिपूरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला नागा पीपल्स फ्रंटचीही (एनपीएफ) साथ मिळाल्याने एन. बिरेन सिंग यांना उद्या शपथविधीसाठी बोलावण्यात येईल. एनपीएफचे राज्यात चार आमदार आहेत. त्यांनी मंगळवारी राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला पाठिंबा दर्शविला.एनपीएफ हा केंद्रात रालोआचा घटक पक्ष आहे. एनपीएफपूर्वी नॅशनल पीपल्स पार्टीच्या (एनपीपी) चार आमदारांनी भाजपाला पाठिंबा घोषित केला होता. एनपीएफच्या चार आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन भाजपा सरकार स्थापन करण्यास पाठिंबा दर्शविला, असे राजभवनातील उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. ६० सदस्यीय मणिपूर विधानसभेत आपल्याला ३२ सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजपाने केला आहे. भाजपा शिष्टमंडळाने रविवारी २८ आमदारांसह राज्यपालांची भेट घेतली होती. भाजपाच्या २१ आमदारांखेरीज ४ एनपीपीचे आमदार, लोजपा आणि तृणमूल काँग्रेसचा प्रत्येकी एक तसेच एका काँग्रेस आमदाराचा समावेश होता. एनपीएफचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावाही भाजपाने केला होता. तसेच नागा पीपल्स फं्रटच्या अध्यक्षांचे पाठिंब्याचे पत्रही सादर केले होते. नवे सरकार स्थापन करण्यासाठी एनपीएफ आमदारांचा कोणाला पाठिंबा आहे हे जाणून घेण्यासाठी राज्यपाल व्यक्तिश: त्यांची भेट घेऊ इच्छितात, असे राजभवनातील सूत्रांनी यापूर्वी म्हटले होते. (वृत्तसंस्था)