शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 16:03 IST

BJP sweeps UT Election 2025: या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी आधीच भाजपाने अनेक जागा बिनविरोध पटकावल्या होत्या. जिथे निवडणुका झाल्या, तिथेही भाजपाने आपले वर्चस्व कायम राखत काँग्रेसला चितपट केले.

BJP sweeps UT Election 2025: एकीकडे देशभरात बिहारमधील विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा सुरू असताना, दुसरीकडे मात्र केंद्रशासित प्रदेशांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाने १२२ पैकी १०७ जागा जिंकत मोठा विजय मिळवला आहे. देशातील सर्वांत जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसला मात्र २ जागांवर समाधान मानावे लागले असून, पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

५ नोव्हेंबर रोजी दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने अनपेक्षित कामगिरी केली, १२२ पैकी १०७ जागा जिंकल्या. काँग्रेस फक्त दोन जागांवर विजय मिळवता आला. भाजपाने दमण जिल्हा पंचायतीच्या १६ पैकी १० जागा आधीच बिनविरोध जिंकल्या होत्या. उर्वरित सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने पाच जागा जिंकल्या, तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. दमण नगरपरिषदेच्या १५ पैकी १२ जागा भाजपाने बिनविरोध जिंकल्या. उर्वरित तीन जागांपैकी दोन जागा भाजपाला आणि एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली.

नगर परिषदेतील सर्व १५ जागा भाजपने जिंकल्या

दादरा नगर हवेली जिल्हा पंचायतीच्या २६ पैकी १७ जागा भाजपाने बिनविरोध जिंकल्या. उर्वरित नऊ जागांसाठी मतदान झाले, त्यात ७ जागा भाजपाला मिळाल्या, तर दोन जागा काँग्रेस उमेदवार विजयी झाले.  दीव जिल्हा पंचायतीच्या ८ जागांपैकी ५ जागा भाजपने बिनविरोध जिंकल्या. उर्वरित जागा मतदानानंतर जिंकल्या. दमण नगर परिषदेत पक्षाने अनपेक्षित निकाल पाहायला मिळाले. १५ पैकी १४ जागा जिंकल्या. दमण ग्रामपंचायतीत, भाजपाने १६ पैकी १५ जागा जिंकल्या. तर, सिल्व्हासा नगर परिषदेतील सर्व १५ जागा भाजपाने जिंकल्या. शिवाय, २६ पैकी १६ ग्रामपंचायत जागांवर भाजपा उमेदवारांनी विजय मिळवला. उर्वरित जागा काँग्रेस समर्थित उमेदवार आणि अपक्षांना मिळाल्या.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी निवडणुकीतील विजयाबाबत कृतज्ञता व्यक्त केली. केंद्रशासित प्रदेशातील सरपंच, जिल्हा पंचायत आणि नगरसेवक निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व पाठिंबा दिल्याबद्दल दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव येथील माझ्या बंधू आणि भगिनींचे आभार मानतो. हे आमच्या पक्षाच्या विकासाच्या अजेंड्याशी केंद्रशासित प्रदेशाचे मजबूत संबंध दर्शवते. मी तळागाळातील आमच्या मेहनती कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करतो, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Tsunami: Sweeps UT Election, Congress Suffers Major Setback

Web Summary : BJP secured a landslide victory in Dadra Nagar Haveli and Daman & Diu local elections, winning 107 of 122 seats. The Congress party only managed to win two seats, marking a significant defeat. PM Modi expressed gratitude for the overwhelming support.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारण