काँग्रेसचे अनेक सोशल मीडिया अकाउंट परदेशातून चालवले जातात; संबित पात्रांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 15:33 IST2025-11-27T15:32:31+5:302025-11-27T15:33:44+5:30
BJP MP Sambit Patra: 'काँग्रेस परदेसातील अकाउंट्सच्या मदतीने भारतविरोधी नरेटिव्ह उभारत आहे.'

काँग्रेसचे अनेक सोशल मीडिया अकाउंट परदेशातून चालवले जातात; संबित पात्रांचा गंभीर आरोप
BJP MP Sambit Patra: भाजप खासदार संबित पात्रा यांनी काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीशी संलग्न असलेल्या काही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की, हे इन्फ्लुएंसर्स पाकिस्तान, बांग्लादेश आणि आग्नेय आशियातील देशांत बसून भारताविरुद्ध प्रचार मोहीम राबवत आहेत. त्यांनी एक्स (माजी ट्विटर) प्लॅटफॉर्मवरील लोकेशन फीचरच्या आधारे हे उघड केले की, काही काँग्रेस नेते आणि राज्यस्तरीय काँग्रेस अकाउंट्स भारताबाहेरुन ऑपरेट होत आहेत.
काँग्रेसच्या अकाउंट्सवर पात्रांचे आरोप
पात्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन खेडा यांचे अकाउंट अमेरिका बेस्ड दाखवत आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अकाउंट आयर्लंडशी जोडलेले दिसले, नंतर ते भारतात बदलण्यात आले. हिमाचल प्रदेश काँग्रेसचे अकाउंट थायलंडशी संबंधित असल्याचा दावा त्यांनी केला. याशिवाय, त्यांनी आरोप केला की 2014 नंतर काँग्रेस आणि डाव्या गटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणि भारताचा अपमान करण्याची एकही संधी सोडलेली नाही.
Addressing Press Conference at @BJP4India HQ, New Delhi. https://t.co/F47Jt0Ime9
— Sambit Patra (@sambitswaraj) November 27, 2025
भारताविरोधी मोहीम विदेशातूनच राबवली जाते
पात्रांनी पुढे म्हटले की, अनेक डावे व काँग्रेस समर्थक इन्फ्लुएंसर्स विदेशातून भारतविरोधी एजेंडा चालवत आहेत. काँग्रेसचे काम देशाला विभागणे आहे, त्यामुळेच ते विदेशातील लोकांशी हातमिळवणी करून भारताविरुद्ध वातावरण तयार करत आहेत. पात्रांनी असाही आरोप केला की, हे अकाउंट्स भारताच्या संवैधानिक संस्थांची बदनामी करत आहेत आणि निवडणूक आयोगासह इतर संस्थांवर आपत्तिजनक टिप्पणी करत आहेत.
तीन प्रकारचे कथित नैरेटिव्ह तयार
त्यांच्या मते परदेशातील काही अकाउंट्सद्वारे भारतात तीन कथित नरेटिव्ह पसरवले जात आहेत. यात वोट चोरीचे नरेटिव्ह, ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पीएम मोदी यांना कमजोर दाखवण्याचा प्रयत्न आणि संघासह पंतप्रधानांवर सतत डिजिटल हल्ले. हा एक संघटित सायबर कट आहे. पात्रांनी यावेळी काही अकाउंट्सबद्दल सांगितले. अर्पित शर्मा नावाच्या एका यूरोप-बेस्ड अकाउंटने व्होट चोरीचा आरोप करत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. एक सिंगापूर-बेस्ड अकाउंट निवडणूक आयोगावर अपमानास्पद पोस्ट टाकल्याचा दावाही त्यांनी केला.